
Asian Games 2026
पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान मोदी घेणार भेट
एशियन गेम्स 2026 मध्ये भारताची शानदार कामगिरी
जपानमध्ये भारताने जिंकली 85 पदके
PM Modi/Asian Games 2026: नुकतीच जपानमध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धा पार पडली. यामध्ये भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. भारताने या स्पर्धेत 21 गोल्ड मेडलसह एकूण 85 पदके जिंकली आहेत. दरम्यान येत्या 15 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता नवी दिल्ली येथील पंतप्रधान निवासस्थानी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या खास सोहळ्यात पंतप्रधान मोदी सर्व पदकविजेत्या खेळाडूंशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. एशियन गेम्समधील खेळाडूंचे अथक परिश्रम, त्यांचा क्रीडा प्रवास आणि मिळवलेले ऐतिहासिक यश यांवर पंतप्रधान त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भारतीय क्रीडा जगताला आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत क्रीडाविश्वात नवा इतिहास रचला आहे. या बहुप्रतिष्ठित स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत एकूण ८५ पदकांची कमाई केली असून, पदकतालिकेत भारताने चौथे स्थान पटकावले आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या अफाट कौशल्याचे प्रदर्शन करत २१ गोल्ड, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदके जिंकली आहेत.
पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…
भारतीय लष्कराच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्नांना आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठे यश मिळाले आहे. पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या (एएसआय) २५ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत १२ पदके पटकावली. भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी मिळविलेल्या एकूण २० पदकांपैकी १२ पदके एएसआयच्या खेळाडूंनी मिळविली आहेत.