Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Padukone : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास

Prakash Padukone : भारताचे भावी क्रीडा चॅम्पियन प्रामुख्याने लहान शहरांमधून घडू शकतात, असा विश्वास माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी शहरांतील युवा खेळाडूंना दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रशिक्षक आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 08, 2026 | 05:31 PM
Prakash Padukon : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास

Prakash Padukon : लहान शहरांत दडलेत भारताचे भावी बॅडमिंटन चॅम्पियन; प्रकाश पदुकोणांचा विश्वास

Follow Us
Follow Us:
  • लहान शहरांतून भावी चॅम्पियन घडणार
  • तळागाळातील प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज
  • सुविधा, प्रशिक्षक आणि साहित्यावर भर
 

भारताचे भावी क्रीडा चॅम्पियन प्रामुख्याने टियर-२ आणि टियर-३ शहरांमधून घडू शकतात, असा विश्वास माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (Prakash Padukone) यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी लहान शहरांतील युवा खेळाडूंना दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रशिक्षक आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’ आणि ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ (IISM) यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या निमित्ताने पदुकोण बोलत होते. यावेळी त्यांनी भारतात बॅडमिंटनची वाढती लोकप्रियता आणि तळागाळातील प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज अधोरेखित केली.

‘या’ तीन गोष्टी महत्त्वाच्या

टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये यापूर्वीही गुणवत्ता होती. मात्र, तिथे पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि खेळाचे साहित्य उपलब्ध नव्हते. कोणत्याही खेळासाठी या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चांगल्या सुविधा, प्रशिक्षक आणि आवश्यक साहित्य, असे पदुकोण यांनी सांगितले.

लहान शहरांमध्ये आता क्रीडा सुविधा आणि संसाधने वाढत असल्याने परिस्थितीत बदल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात देशाला मोठ्या प्रमाणात चॅम्पियन लहान शहरे आणि जिल्ह्यांमधून मिळतील, असे पदुकोण म्हणाले.

त्यांच्या मते, खेळाडूंना सुरुवातीपासूनच योग्य प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. केवळ एलिट खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पदकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी बॅडमिंटनचा तळागाळातील पाया मजबूत करण्याची गरज आहे. अधिकाधिक मुलांनी बॅडमिंटन खेळावे आणि त्यांना सुरुवातीपासूनच योग्य तंत्र शिकवले जावे, याला प्राधान्य दिले पाहिजे.

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे आव्हान

पदुकोण यांनी अलीकडील १५ आणि १७ वर्षांखालील स्पर्धेचे उदाहरण दिले. या स्पर्धेसाठी सुमारे ४ हजार प्रवेशिका आल्या होत्या. दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या पहिल्या पाच दिवसांत तब्बल २२ कोर्ट्सची आवश्यकता भासली. बॅडमिंटनची वाढती लोकप्रियता दिसून येत असली, तरी त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे आव्हानही समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणाच्या दर्जाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या काम सुरू असले तरी अजून खूप काही करणे बाकी आहे, असे पदुकोण यांनी स्पष्ट केले.

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

खेळाडूच्या प्रगतीची संपूर्ण जबाबदारी केवळ प्रशिक्षकावर टाकता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सलग पराभव झाल्यानंतर काही युवा खेळाडू अकादमी किंवा प्रशिक्षक बदलतात. मात्र, स्वतःच्या खेळातील उणिवांचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी प्रशिक्षकांना दोष देण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे पदुकोण यांनी नमूद केले.

तळागाळातील प्रशिक्षणाचा दर्जा सुधारला, योग्य सुविधा उपलब्ध झाल्या आणि खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन मिळाले, तर लहान शहरांमधून देशाला भविष्यात मोठे बॅडमिंटनपटू मिळू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Prakash padukone future champions tier 2 tier 3 cities badminton rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Badminton
  • Champions
  • Sports

संबंधित बातम्या

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
1

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.