
दुखापतीमुळे प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर (Photo Credit - X)
Pratika Rawal out of Women’s World Cup 2025 Tournament: महिला आयसीसी विश्वचषक २०२५ च्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची सलामीची फलंदाज प्रतिका रावल (Pratika Rawal) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर झाली आहे. भारतीय संघ गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल सामना खेळणार आहे. रविवारी बांगलादेशविरुद्ध नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या साखळी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना प्रतीका रावलला दुखापत झाली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
🚨Pratika Rawal has been ruled out of the ICC Women’s World Cup after suffering an injury in the last league game against Bangladesh #ICCWomensWorldCup2025 #IndianCricket pic.twitter.com/FTA6dchh47 — Cricbuzz (@cricbuzz) October 27, 2025
बांगलादेशच्या डावातील २१ व्या षटकात शर्मिन अख्तरने दीप्ती शर्माच्या चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने शॉट मारला. चेंडू थांबवण्यासाठी प्रतिका रावल वेगाने धावली, परंतु तिचा पाय आउटफिल्डमधील टर्फमध्ये (गवताच्या थरात) अडकला आणि तो मोठ्या प्रमाणात वाकला दुखापतीनंतर तिला खूप वेदना होत होत्या. संघाचे फिजिओ तात्काळ मैदानात धावले. काही वेळानंतर प्रतीका लंगडत मैदानाबाहेर पडली. उपांत्य फेरीला दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ असला तरी, प्रतीकाला पूर्णपणे बरे होण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने ती या निर्णायक सामन्यातून बाहेर झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप तिच्या दुखापतीबाबत नवीन माहिती जाहीर केलेली नाही.
प्रतिकाच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनासोबत सलामीला कोण येणार, हा भारतीय संघासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताने अष्टपैलू अमनजोत कौरला सलामीला पाठवले होते. त्यामुळे, ती एक पर्याय आहे. याशिवाय, मधल्या फळीतील फलंदाज हरलीन देओल देखील स्मृतीसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे.
IND VS AUS : अरे रे! भारताच्या नशिबी हे काय? 18 ODI सामन्यात TOSS ने दाखवली पाठ; कर्णधार बदलला पण….