भारताने सलग १८ वेळा टॉस गमावला(फोटो-सोशल मीडिया)
World record for losing the toss in 18 ODI matches : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. सुरुवातीचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली होती. परंतु, शेवटचा सामना भारताने जिंकून मालिकेचा शेवट करून मालिका २-१ अशी सुटली. या मालिकेत भारतीय कर्णधाराने सलग तीन सामन्यात नाणेफेक गमावली. दरम्यान भारताने मागील सलग १८ एकडीवसी सामन्यात नाणेफेक गमावली आहे. याबद्दल जाणून घेऊया.
टीम इंडियाने शेवटचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये टॉस कधी जिंकला ? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे, जवळजवळ दोन वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये टॉस जिंकलेला नाही. २३ महिने उलटले, टीम इंडियाने १८ एकदिवसीय सामने खेळले, कर्णधारही बदलला, तरीही टीम इंडियाचे नशीब बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारत टॉस हरण्याचा आपला विश्वविक्रम मजबूत करत आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध २०२३ च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतीत शेवटचा एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला होता. हा १५ सामना नोव्हेंबर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. तेव्हापासून, भारतीय कर्णधाराला सतत एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकण्यात अपयश आले आहे.
हेही वाचा : ‘2027 चा विश्वचषक कारकिर्दीचा शेवट…’, एबी डिव्हिलियर्सचे Virat Kohli बद्दल खळबळजनक विधान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला नाणेफेक जिंकरण्यात अपयशच आले. आयर्लंडच्या नावे होता विक्रम एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग टॉस गमावण्याचा विक्रम आयर्लंडच्या नावावर होता, ज्याने ११ टॉस गमावले होते, * परंतु भारताने १८ टॉस गमावले आहेत.
टीम इंडियाने सलग १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस गमावून अवांछित विश्व विक्रम प्रस्थापित केला आणि ही मालिका अखंड आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही सलग १८ वेळा नाणे फेकले तर सलग १८ वेळा असे होण्याची शक्यता फक्त एकदाच असते. यावरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत टीम इंडियाचे नशीब किती वाईट आहे याची कल्पना येते. गणितीयदृष्ट्या, एका सामन्यात नाणेफेक जिंकण्याची किंवा हरण्याची ५०% किंवा ०.५ किंवा दोनपैकी एक शक्यता असते. सलग दोन सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकण्याची किंवा हरण्याची शक्यता ४ पैकी १, किंवा ०.२५ किंवा २५% असते. त्याचप्रमाणे, १८ सामन्यांमध्ये ही संधी २ टू द पावर १८ किंवा २,६२,१४४ असू शकते. आता गिलने पुढील दोन सामन्यांमध्येही नाणेफेक गमावली, तर तो १० लाख (१०,४८,५७६) मध्ये १ नाणेफेक जिंकण्याची संधीही गमावू शकतो.
हेही वाचा : रोहित शर्मा-विराट कोहलीचे कधी होणार पुनरागमन? जाणून घ्या संपूर्ण माहिती, घरच्या मैदानावर दिसणार खेळताना
७१२ दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टॉस गमावण्याची मालिका सुरू झाली आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ती सुरूच आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग १५ टॉस गमावले आणि आता गिलच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी तीन गमावले आहेत. तथापि, चांगली गोष्ट एवढीच की, या काळात भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. त्या स्पर्धेतही भारताने एकदाही टॉस जिंकला नाही.






