
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पाकिस्तान सुपर लीग २०२६ ही २६ मार्च रोजी सुरू होणार आहे, परंतु सुरु होण्यापूर्वीच लीगवर संकटाचे काळे ढग दाटून आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी अनेक धक्कादायक बदल केले आहेत, ज्यामुळे लीगची चमक फिकी पडली आहे. या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर पीसीबीची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचा या स्पर्धेवर थेट परिणाम झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे संपूर्ण आशियामध्ये इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
पाकिस्तान सध्या एका गंभीर संकटाचा सामना करत असून, त्यामुळे तेथील सरकारला कडक निर्बंध लादण्यास भाग पडले आहे. संपूर्ण पीएसएल स्पर्धा आता प्रेक्षकांशिवाय खेळवली जाईल. पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये एका पत्रकार परिषदेत परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून पीएसएलमधील थेट सामने चाहत्यांना पाहू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
🚨MOHSIN NAQVI BIG DECISIONS FOR PSL 2026🚨 – PSL 2026 starts on March 26, only in Lahore & Karachi.
– No crowd matches until the fuel crisis ends.
– Opening ceremony cancelled. PSL 2026 = Low budget, no crowd, crisis mode cricket.😭pic.twitter.com/qZtmVeYHly — Sam (@Cricsam01) March 22, 2026
नक्वी यांच्या मते, “इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत, घरून काम करण्याची व्यवस्था (वर्क-फ्रॉम-होम) लागू करण्यात आली आहे आणि ईदच्या सुट्ट्याही वाढवण्यात आल्या आहेत. हे युद्ध किती काळ चालेल याची कोणतीही खात्री नाही.” सुरक्षा यंत्रणांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर, लीग रद्द करण्याऐवजी ती प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या विनोदी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘आइसलँड क्रिकेट’ने ट्विटरवर एक पोस्ट टाकली, जी लगेचच व्हायरल झाली.
PSL 2026 : परदेशी खेळाडूंनी दाखवली PSL ला त्यांची जागा! पाकिस्तानला बसू शकतात आणखी दोन मोठे धक्के
त्यानी लिहिले, “पीएसएल येत आहे, आणि ही लाखो चाहत्यांसाठी एक रोमांचक गोष्ट आहे. पीएसएलचा अर्थ काय आहे, असा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा, आता कळलंय की ती ‘पेट्रोल शॉर्टेज लीग’ आहे.” या टिप्पणीनंतर, सोशल मीडियावर #PetrolShortageLeague ट्रेंड होऊ लागला. चाहत्यांनी पीसीबीवर टीका करण्यासाठी या हॅशटॅगचा वापर केला. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की, यामागील खरे कारण केवळ पेट्रोलचा तुटवडा नसून, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सध्याचा लष्करी तणाव आहे, ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
The PSL is coming up and that is very exciting for many millions of cricket fans. We have always wondered what PSL stands for and it turns out it means Petrol Shortage League. — Iceland Cricket (@icelandcricket) March 22, 2026