Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व

Pune Sports News: स्पर्धेतील प्रीमियम क्लासमध्ये सार्थक चव्हाणने आपल्या अद्वितीय रायडिंग तंत्राची चुणूक दाखवत तीनही क्लासमध्ये थेट विजेतेपद पटकावले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 09:45 PM
३०० सीसीच्या बाईकवर ४५० सीसीच्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ

३०० सीसीच्या बाईकवर ४५० सीसीच्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ

Follow Us
Follow Us:
  • महाडर्ट ट्रॅक चॅलेंजमध्ये सार्थक चव्हाणचा दबदबा
  • तीनही क्लासमध्ये प्राप्त केले विजेतेपद
  • शीतल राठोड यांच्या उत्कृष्ट आयोजनात पार पडली स्पर्धा
पुणे/Racing: येथील गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’ मोटारसायकल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १९ वर्षीय युवा रायडर सार्थक चव्हाण याने (Pune) दमदार कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेवर आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. गणेश फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर पार पडल्यामुळे या स्पर्धेला मोटारसायकल रेसिंग जगतात विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

या संपूर्ण भव्य स्पर्धेची धुरा आयोजक शीतल राठोड यांनी समर्थपणे पेलली होती. एका महिला आयोजकाने जिद्द, अचूक नियोजन आणि कठोर परिश्रमांच्या बळावर अशा आव्हानात्मक मोटारसायकल रेसिंग इव्हेंटचे यशस्वी आयोजन करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या मोटारस्पोर्ट्ससारख्या साहसी क्षेत्रात महिलाही प्रभावी नेतृत्व करू शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. या आयोजनात त्यांच्या संपूर्ण टीमनेही मोलाची साथ दिली.

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ

३०० सीसीच्या बाईकवर ४५० सीसीच्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ

स्पर्धेतील प्रीमियम क्लासमध्ये सार्थक चव्हाणने आपल्या अद्वितीय रायडिंग तंत्राची चुणूक दाखवत तीनही क्लासमध्ये थेट विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रतिस्पर्धी रायडर्स ४५० सीसी क्षमतेच्या शक्तिशाली मोटारसायकली चालवत असताना, सार्थकने अवघ्या ३०० सीसी क्षमतेच्या मोटारसायकलवर रेस केली. कमी क्षमतेचे इंजिन असूनही त्याने दाखवलेला प्रचंड वेग, वळणांवरील उत्कृष्ट नियंत्रण आणि कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत विजय खेचून आणला. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला स्पर्धेतील ‘बेस्ट रायडर’ या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले.

चव्हाण बंधूंची दुहेरी चमक

सार्थकसोबतच त्याचा भाऊ दर्शित चव्हाण यानेही ट्रॅकवर शानदार प्रदर्शन करत आपल्या गटात तिसरा क्रमांक पटकावला. या दोन्ही भावांच्या चमकदार कामगिरीमुळे मोटरस्पोर्ट्स विश्वात चव्हाण कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याशिवाय स्पर्धेतील विविध गटांमध्ये जिब्रान शेख, जिरेंदर सांगवी आणि लोकेश भोसले यांनीही आपापल्या क्लासमध्ये दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावून स्पर्धेची चुरस वाढवली.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

संयोजकांचे मानले आभार

विजयानंतर भावना व्यक्त करताना सार्थक चव्हाण म्हणाला, “महा डर्ट ट्रॅक चॅलेंजचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि दर्जेदार झाले. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे युवा रायडर्सना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते.” या वेळी सार्थकने मुख्य आयोजक शीतल राठोड, उमेश निर्मळ, ‘एक्स्ट्रीम मोटरस्पोर्ट्स अँड रेसिंग’ची संपूर्ण टीम तसेच सपोर्टिंग आयोजक असलेल्या कोल्हापूरच्या ‘रॉयल रोडिओ’चे मनापासून आभार मानले.शीतल राठोड यांचे कणखर नेतृत्व, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सर्व सहयोगी संस्थांच्या सहकार्यामुळे पार पडलेल्या या ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’ स्पर्धेने राज्यातील मोटारस्पोर्ट्स क्षेत्रात आपली एक वेगळी आणि दर्जेदार छाप सोडली आहे.

Web Title: Pune sarthak chavan won titles in all three classes at the maha dirt track challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • bike rider
  • pune news
  • Racing
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’
1

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा
2

अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
4

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.