Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…

Table Tennis: ३० वर्षांवरील महिला गटाच्या उपांत्य फेरीत रेखा होळंबे हिने कल्पना खानापुरे हिच्यावर ६-०, ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तृप्ती होळंबे हिने पुढे चाल मिळवत अंतिम फेरी गाठली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2026 | 03:21 PM
गौरव रावचे जागतिक मास्टर्स टेनिसमध्ये वर्चस्व

गौरव रावचे जागतिक मास्टर्स टेनिसमध्ये वर्चस्व

Follow Us
Follow Us:
  • गौरव रावचे जागतिक मास्टर्स टेनिसमध्ये वर्चस्व
  • कोहिनूर-एनईएस एमटी-२०० स्पर्धेत मोहित सोरडेचा पराभव
  • विविध गटांत उपांत्य फेरीचे सामने रंगले
Table Tennis/Nanded: नांदेड डिस्ट्रिक्ट अँड सिटी लॉन टेनिस संघटनेच्या वतीने, आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित कोहिनूर-एनईएस एमटी-२०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ३० वर्षांवरील पुरुष एकेरीत गौरव राव याने विजेतेपद पटकावले. एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील अनुभवी टेनिसपटूंनी सहभाग घेतला आहे.

३० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात दुसरा मानांकित गौरव राव याने अव्वल मानांकित मोहित सोरडे याचा ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गौरवने सामन्यावर वर्चस्व राखले. मोहितला आपल्या खेळात सातत्य राखता न आल्याने गौरवने सहज विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.

रेखा होळंबेचा एकतर्फी विजय

३० वर्षांवरील महिला गटाच्या उपांत्य फेरीत रेखा होळंबे हिने कल्पना खानापुरे हिच्यावर ६-०, ६-१ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तृप्ती होळंबे हिने पुढे चाल मिळवत अंतिम फेरी गाठली.३५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत शशांक बोमनाळे याने विनीत तेहरा याचा ६-४, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी

अव्वल मानांकिताला दिला धक्का

४० वर्षांवरील पुरुष गटात बिगरमानांकित गणेश देवखिळे याने अव्वल मानांकित राम कुमार चौधरी याला ६-२, ७-५ असे नमवत स्पर्धेत मोठा धक्का दिला. दुसरा मानांकित जयनारायण केआर याने लक्ष्मीनिवास कलंत्रीचा ६-१, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.४५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडी याने नीलेश चांडकचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर पराग अत्रे यांना पुढे चाल मिळाल्याने त्यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे या गटातील अंतिम सामन्याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

३० वर्षांवरील पुरुष – अंतिम फेरी
गौरव राव (भारत) [२] विजयी वि. मोहित सोरडे (भारत) [१] — ६-१, ६-२

३० वर्षांवरील महिला – उपांत्य फेरी
रेखा होळंबे (भारत) विजयी वि. कल्पना खानापुरे (भारत) — ६-०, ६-१
तृप्ती होळंबे (भारत) — पुढे चाल वि. सपना शहा (भारत) [१]

३५ वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी
शशांक बोमनाळे (भारत) विजयी वि. विनीत तेहरा (भारत) — ६-४, ६-२

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

४० वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी
गणेश देवखिळे (भारत) विजयी वि. राम कुमार चौधरी (भारत) [१] — ६-२, ७-५
जयनारायण केआर (भारत) [२] विजयी वि. लक्ष्मीनिवास कलंत्री (भारत) — ६-१, ६-२

४५ वर्षांवरील पुरुष – उपांत्य फेरी
स्वरणदीप सिंग धोडी (भारत) [१] विजयी वि. नीलेश चांडक (भारत) — ६-३, ६-२
पराग अत्रे (भारत) — पुढे चाल वि. अरिंदम देब (भारत)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गौरव रावने अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूचा पराभव केला?

    Ans: गौरव रावने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मोहित सोरडे याचा ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

  • Que: जागतिक वर्ल्ड मास्टर्स टेनिस स्पर्धेत ३० वर्षांवरील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: जागतिक वर्ल्ड मास्टर्स टेनिस स्पर्धेत ३० वर्षांवरील पुरुष एकेरीचे विजेतेपद गौरव राव याने पटकावले.

Web Title: Gaurav rao win the world masters table tennis competition nanded pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • nanded news
  • Pune Sports News
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral
1

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश

पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज्‌ संघाने थेट…
3

पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज्‌ संघाने थेट…

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर
4

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.