Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral

Sachin Tendulkar: क्रिकेटचा हा रोमांचक सामना संपल्यानंतर या शाही कुटुंबाने मुंबईच्या संस्कृतीचा आनंद घेतला. यासोबतच त्यांनी मुंबईच्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेतल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2026 | 02:13 PM
प्रिन्स विल्यम आणि केट तेंडुलकरसोबत खेळले क्रिकेट

प्रिन्स विल्यम आणि केट तेंडुलकरसोबत खेळले क्रिकेट

Follow Us
Follow Us:
  • प्रिन्स विल्यम आणि केट तेंडुलकरसोबत खेळले क्रिकेट
  • मुंबईच्या गल्लीत रंगला क्रिकेटचा सामना 
  • क्रिकेट खेळताना व्हिडिओ झाला व्हायरल 
Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. सचिन तेंडुलकर आपल्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. नूतकच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. सचिन आणि ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बॅलार्ड इस्टेट परिसरात भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि शालेय मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन बॅलार्ड इस्टेटमधील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसून आले. यावेळी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने त्यांचे स्वागत केले. शाही प्रोटोकॉल बाजूला ठेवून या दोघांनीही शालेय मुलांच्या संघात सामील होत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. केट मिडलटन यांनी सुंदर पारंपरिक भारतीय पोशाख परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

Virat Kohli: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर! ‘इतक्या’ धावा करताच मोडणार मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड

बॅलार्ड इस्टेटच्या मैदानावर प्रिन्स विल्यम यांनी सुरुवातीला फलंदाजी केल्याचा व्हीडिओत दिसत आहे. त्यानंतर त्यांनी त्यांनी चक्क केट मिडलटन आणि सचिन तेंडुलकरला गोलंदाजी केली. त्यामुळे बाजूला खेळणारी मुले देखील आनंदी झाल्याचे दिसून आले. क्रिकेटच्या या अनपेक्षित आणि मजेशीर सामन्याने उपस्थितांचे मन जिंकून घेतले.

Prince William bowling to Sachin Tendulkar 😂😂😂 https://t.co/cx32tDR73A — Astronaut 🚀 (@TheRobustRascal) November 16, 2026

क्रिकेटचा हा रोमांचक सामना संपल्यानंतर या शाही कुटुंबाने मुंबईच्या संस्कृतीचा आनंद घेतला. यासोबतच त्यांनी मुंबईच्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेतल्याचे दिसून आले. ब्रिटनच्या शाही पाहुण्यांनी घेतलेला हा अनुभव त्यांच्या भारत दौऱ्यातील अत्यंत संस्मरणीय क्षण ठरला आहे.

Sachin Tendulkar : स्वच्छ भारत मोहिमेला सचिनची साथ; कचरा व्यवस्थापनासाठी Recykal सोबत नवी भागीदारी

ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांच्यासोबत मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे गल्ली क्रिकेट खेळल्यानंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने दहा वर्षांपूर्वीच्या एका खास आठवणीला उजाळा दिला.बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच एप्रिल २०१६ मध्ये जेव्हा हे शाही दाम्पत्य भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी एका अधिकृत क्रिकेट मैदानावर एकत्र क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला होता. त्या भेटीदरम्यान पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू, तेव्हा नक्कीच मुंबईच्या रस्त्यांवर ‘गल्ली क्रिकेट’ खेळू, असा विचार सचिनने त्यावेळेस व्यक्त केला होता.

Web Title: Sachin tendulkar and prince of wales william and princess of wales kate middleton playing cricket video viral in mumbai tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Sachin Tendulkar
  • Sports News
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल
1

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न
3

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क
4

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.