दुखापतीवर श्रेयस अय्यरचे स्पष्टीकरण (फोटो -सोशल मिडिया)
श्रेयस अय्यरने दुखापतीवर दिली मोठी अपडेट
गुजरात विरुद्धच्या सामन्यात अय्यर झालेला जखमी
पंजाब किंग्जने मिळवला 3 विकेट्सने गुजरातवर विजय
PBKS vs GT Shreyas Iyer Injury Update: काल गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात चंदीगडमध्ये सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा (IPL 2026)3 विकेट्सने पराभव केला. हातातोंडाशी आलेला सामना गुजरात टायटन्सने गमावला. कूपर कॉनलीच्या वादळी खेळीने पंजाबचा विजय झाला. मात्र त्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला आहे. त्यामुळे आता तो पुढील सामने खेळू शकणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
पंजाब किंग्ज 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली होती. त्यावळेस कर्णधार श्रेयस अय्यर आणि कूपर कॉनली एकतर फलंदाजी करत होते. कूपर कॉनलीचा एक शॉट समोर उभा असणाऱ्या श्रेयस अय्यरला लागला. त्यामुळे अय्यर जखमी झाला. लगेचच श्रेयस अय्यरवर उपचार करण्यात आले. दरम्यान आता यावर कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे.
सामन्यात झालेल्या दुखापतीवर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “आता सर्व काही ठीक आहे, इतकेच मी तुम्हाला सांगू शकतो. मला हे प्रकरण अधिक वाढवायच नाही. अल सकारात्मक राहायचे आहे. अपेक्षा आहे की सर्व काही ठीक होईल.” यावरून श्रेयस अय्यरला झालेली दुखापत इतकी गंभीर नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच तो पुढील सामन्यासाठी तयार असल्याचे देखील म्हंटले जात आहे. गुजरात विरुद्ध श्रेयसने 11 चेंडूत 18 धावा केल्या.
IPL 2026: जिंकल्यानंतरही श्रेयस अय्यरला BCCI ने ठोठावला दंड, 12 लाखाचे नुकसान; काय आहे कारण
श्रेयस अय्यरला BCCI ने ठोठावला दंड
आयपीएल समितीने पंजाब किंग्स (पीबीकेएस) चा कर्णधार श्रेयस अय्यरला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्ध पंजाब किंग्सच्या (पीबीकेएस) विजयानंतर श्रेयस अय्यरवर १.२ दशलक्ष रुपयांचा मोठा दंड लावला आहे. हा सामना मंगळवारी (३१ मार्च) न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, जो २०२६ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा उद्घाटनाचा सामना होता. २०२५ च्या अंतिम फेरीतील संघाने हा थरारक सामना तीन गडी राखून जिंकला. पदार्पण करणाऱ्या कूपर कॉनॉलीने ४४ चेंडूंमध्ये नाबाद ७२ धावा करून सामनावीर (POTM) पुरस्कार पटकावला.
श्वास थांबला अन्… ! GT विरुद्ध PBKS चा रोमहर्षक विजय; Cooper Connolly ने ‘टायटन्स’ला लोळवलं
Cooper Connolly ने ‘टायटन्स’ला लोळवलं
पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगडमध्ये आयपीएलचा सामना पार पडला. पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गुजरातच्या फलंदाजांनी संयमी खेळी करून धावा केल्या. मात्र शुभमन गिल आणि बटलर बाद झाल्यावर मोठी धावसंख्या उभारण्यात गुजरातचा संघ अपयशी ठरला. अखेर पंजाब किंग्ज संघाने गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.






