
badminton league
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सह सचिव सारंग लागू आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे बारावे वर्ष असून, स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत नॉमिनेटेड खेळाडू गट, महिला गट, प्रौढ गट आणि खुला गट अशा विविध गटातून १७८ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून १० संघांमध्ये याची विभागणी करण्यात आली आहे.
एक खेळाडू टायमध्ये फक्त १ सामना खेळू शकणार आहे. प्रत्येक टायमध्ये ७ सामने खेळण्यात येणार आहेत. सर्व सामने हे बेस्ट ऑफ थ्री पद्धतीत खेळविण्यात येणार असून, पहिल्या दोन सामन्यात बरोबरी झाल्यास निर्णायक सामना खेळविण्यात येणार आहे. तसेच, हि स्पर्धा किड्स गटात देखील होणार असून, यामध्ये ४८ खेळाडूंची निवड चार संघांमध्ये करण्यात आली आहे. रॉबिन्स, गुल्स, फिंच, जॅझ हे चार संघ झुंजणार आहेत.
ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने साखळी फेरीत होणार असून दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरणार आहे. उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले. नंदन डोंगरे स्पर्धा संचालक म्हणून काम पाहतील. या वर्षी स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीने स्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एक सामना खेळल्यास या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत.
१० संघांची अ व ब अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी ५ संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी सामना खेळणार आहे. साखळी फेरीतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. एका टाय मध्ये ४ खुले गटाचे दुहेरी सामने, १ मिश्र दुहेरी सामना आणि २ प्रौढ खुला दुहेरी गट असे एकूण ७ सामने होतील. स्पर्धेतील दहा संघांतील खेळाडूंची निवड हि लिलावपद्धतीने करण्यात आली आहे. या संघांमध्ये एरियल स्विफ्टस, बेल्फिन्स टायगर्स, फाल्कन ऑप्टीमा, हॉक्स, इम्पेरिअल स्वान्स, जोग कॉमेट्स, कारा इंटलेक्ट कियाज, नाडगोंडे रेव्हन्स, वन लिटिल फार्म सनबर्डस, सेइनुमेरो रॉकेट्स हे दहा संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले.
स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये तन्मय आगाशे, सारंग लागू, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, विवेक सराफ, रणजित पांडे, केदार नाडगोंडे, अमित देवधर, आमोद प्रधान, देवेंद्र चितळे, समीर जालन, राधिका इंगळहळीकर, मधुर इंगळहळीकर यांचा समावेश आहे.