
१४ वर्षाखालील स्पर्धेत सार्क अकादमी ठरले उपविजेता
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावरील अंतिम सामन्यात पुणे क्रिकेट क्लबच्या सार्थक पाटील (३-२२), सचिन चव्हाण (२-२४), मितांशू मंडल (१-२०), पार्थ हेगिष्टे (१-२०), हर्ष पाष्ट्ये (१-२०) यांच्या सुरेख गोलंदाजीपुढे प्रथम फलंदाजी करताना सार्क क्रिकेट अकादमीचा डाव ४५.४ षटकात सर्वबाद १८१ धावावर संपुष्टात आला. यात साईराज निश्चित ६३, अवधूत कानडे २२, विश्वजीत शिंदे १९, ओम पवार १४ यांनी धावा केल्या.
हे आव्हान पुणे क्रिकेट क्लब संघाने ३८.१ षटकात ६ बाद १८२ धावा करून पूर्ण केले. यात राजवीर राऊत ३२, रोनक गोयल नाबाद ३२, अमरेंद्र यादव २८, सार्थक पाटील २२, सचिन चव्हाण २१ यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू खेळी करणारा सार्थक पाटील सामन्याचा मानकरी ठरला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शरद पांडे, शिवलिंग अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक दिनेश पाटील, निलेश कुलकर्णी आणि मेलिता पाष्ट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
सार्क क्रिकेट अकादमी: ४५.४ षटकात सर्वबाद १८१ धावा(साईराज निश्चित ६३(८९,१०x४), अवधूत कानडे २२, विश्वजीत शिंदे १९, ओम पवार १४, सार्थक पाटील ३-२२, सचिन चव्हाण २-२४, मितांशू मंडल १-२०, पार्थ हेगिष्टे १-२०, हर्ष पाष्ट्ये १-२०) पराभूत वि.पुणे क्रिकेट क्लब: ३८.१ षटकात ६ बाद १८२ धावा(राजवीर राऊत ३२(३४,५x४), रोनक गोयल नाबाद ३२(२५,६x४), अमरेंद्र यादव २८, सार्थक पाटील २२, सचिन चव्हाण २१, कृष्णा राऊत २-३४, शिवराज नागवडे १-२६); सामनावीर – सार्थक पाटील
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: हर्ष पाष्ट्ये, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मितांशू मंडल, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक, रोनक गोयल, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सार्थक पाटील, मालिकावीर-रुद्र पाबळे.
Ans: पुणे क्रिकेट क्लबने डीएसपी करंडक जिंकला आहे.
Ans: पुणे क्रिकेट क्लबने सार्क क्रिकेट अकादमीचा पराभव केला.
Ans: वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर स्पर्धा पार पडली.