
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ सध्या एकदिवसीय मालिका खेळत आहे, या मालिकेचा शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. तर भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंह याने क्रिकेटमध्ये निवृती घेतल्यानंतर तो संघ बऱ्याच कारणामुळे चर्चेत पाहायला मिळाला आहे. युवराज सिंह याने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसारख्या दमदार खेळाडूंना त्याने शिकवण दिली आहे. त्याचबरोबर तो त्याच्या बिझनेसमध्ये देखील कमालीची प्रगती करत आहे.
दिल्लीमधील त्याचे रेस्टारंट फारच प्रसिद्ध आहे, रेस्टारंटमधील दमदार पदार्थ देखील त्याचे फन्स खाण्यासाठी जात असतात. आता त्याने नव्या बिझनेसमध्ये पाय ठेवला आहे. यासाठी त्याने एक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेकजण उपस्थित होते. भारताच्या संघातील माजी खेळाडू सुरेश रैना, मोहम्मद कैफ त्याचबरोबर युझवेंद्र चहल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता सध्या या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Yuvraj Singh and Suresh Raina dancing together 🤣❤️ – Two of the greatest left handed batsmen India has ever produced. pic.twitter.com/pcSB22DnBL — 𝐉𝐨𝐝 𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 (@jod_insane) December 5, 2025
भारताचा स्टार युवराज सिंह आणि सुरैश रैना हे या कार्यक्रमामध्ये नाचताना दिसत आहेत. युवराज सिंह आणि सुरैश रैना हे दोघेही कजरा रे कजरा रे गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला अनेक कलाकार आणि खेळाडू युवराज सिंह याला सपोर्ट करण्यासाठी आले होते. या व्हिडियोला चाहत्यांनी फार पसंती दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही खेळांडूंना त्यांच्या चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले आहे.
IND vs SA : भारतीय प्रशिक्षकांनी ODI सामन्यांच्या वेळेत बदल करण्याची केली मागणी! सांगितले मोठे कारण
युवराज सिंह याच्यासोबत सोशल मिडियावर सुरेश रैनाने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने लिहिले आहेत की, युवी पा, @yuvisofficial तू नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व केले आहेस – आता व्यवसायातही! FINO च्या लाँचबद्दल अभिनंदन. तुझा खूप अभिमान आहे.