Rajat Patidar Century: केवळ तीन कसोटी सामन्यांनंतर टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) दुलीप ट्रॉफीमध्ये धडाकेबाज शतक ठोकलं आहे. सेंट्रल झोनचा कर्णधार असलेल्या पाटीदारने गुरुवारी नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध ही शतकी खेळी केली. या शतकामुळे निवडकर्त्यांचं लक्ष नक्कीच वेधलं जाईल, अशी आशा पाटीदारला असेल.
रजत पाटीदारने भारतासाठी शेवटचा सामना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता आणि त्यानंतर तो संघाबाहेर आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे. या वर्षीच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाटीदारच्या नेतृत्वाखालीच आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं होतं.
𝑪𝑬𝑵𝑻𝑼𝑹𝒀 𝑭𝑶𝑹 𝑪𝑨𝑷𝑻𝑨𝑰𝑵 𝑹𝑨𝑱𝑨𝑻 𝑷𝑨𝑻𝑰𝑫𝑨𝑹! 🤍💯
Central Zone skipper Rajat Patidar smashed a brilliant ton in just 80 deliveries, hitting 18 fours and 2 sixes in the Duleep Trophy 2025! 🔥🤝#RajatPatidar #CZvNEZ #DuleepTrophy #Sportskeeda pic.twitter.com/5YVROrIRGk
— Sportskeeda (@Sportskeeda) August 28, 2025
गुरुवारपासून दुलीप ट्रॉफीचे दोन उपांत्यपूर्व सामने सुरू झाले आहेत. एका सामन्यात सेंट्रल झोनसमोर नॉर्थ ईस्ट झोन आहे, तर दुसरा सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ झोन यांच्यात खेळला जात आहे. सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यातील सामन्यात पहिल्या दिवशी फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. या संघाचा कर्णधार रजत पाटीदार आणि दानिश मालेश्वराने शतकं झळकावली. टी-ब्रेकपर्यंत दानिश मालेश्वर 132 धावांवर तर रजत पाटीदार 111 धावांवर नाबाद होते.
रजत पाटीदारने 111 धावा 130.58 च्या स्ट्राइक रेटने केल्या, यावरून त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची कशी धुलाई केली असेल याचा अंदाज येतो. दिवसाचं तिसरं सत्र सुरू होण्यापूर्वी त्याने 85 चेंडूंचा सामना केला, ज्यात त्याने २० चौकार आणि २ षटकार मारले. दुसरीकडे, दानिश मालेश्वराने १३२ धावा काढण्यासाठी १७१ चेंडू खेळले.
रजत पाटीदारची या सामन्यासाठी सेंट्रल झोनच्या संघात फलंदाज म्हणून निवड झाली होती. पण, सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार ध्रुव जुरेल अचानक अनफिट झाला. कमरेच्या दुखण्यामुळे तो हा सामना खेळत नसल्याचं समोर आलं. त्यामुळे रजत पाटीदारला संघाचं कर्णधारपद मिळालं आणि त्याने शतक ठोकून या संधीचं पुरेपूर सोनं केलं.