दुलीप ट्रॉफी २०२५(फोटो-सोशल मीडिया)
बंगळुरू : आजपासून बीसीसीआयची देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा थरार सूरु झाला आहे. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू दममदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. १९६० च्या दशकात दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरवात झाली आहे. या स्पर्धेत सहा झोनल संघ सहभागी झाले आहेत. गेल्या हंगामात, जेव्हा ही स्पर्धा अनियंत्रितपणे आयोजित करण्यात आली होती तेव्हा भागधारक नाराज होते. नंतर अपेक्षेप्रमाणे स्पर्धा जुन्या स्वरूपात खेळवली जाता आहे. बीसीसीआयने त्यांच्या स्टार खेळाडूंना राष्ट्रीय संघात नसल्यास किंवा दुखापतग्रस्त नसल्यास देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य केले आहे, त्यामुळे या स्पर्धेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
भारताच्या कसोटी संघात आपले स्थान गमावावे लागले नंतर आशिया कप स्पर्धेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. श्रेयस अय्यर भरपूर धावा करण्याचा प्रयत्न करेल तर अलीकडेच इंग्लंड दौऱ्यासाठी दुर्लक्षित करण्यात आलेल्या सरफराजच्या बाबतीतही असेच घडले आहे. जयस्वालच्याबबत त्याची चूक नसतानाही त्याला आशिया कप संघातून डच्चू देण्यात आला आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील दक्षिण विभागीय संघातील आर साई किशोरवर सर्वांचे लक्ष असणार आहे. जो हाताच्या दुखापतीमुळे बुची बाबू स्पर्धेतून बाहेर पडला होता.
देवदत्त पडिकल दुखापतीतून पुनरागमन करत असून प्रभावी कामगिरीमुळे त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते. तसेच अभिमन्यू ईश्वरन, दुखापतग्रस्त इशान किशनच्या अनुपस्थितीत पूर्व विभागीय संघाचे नेतृत्व करेल. गोलंदाजी विभागात, मोहम्मद शमीच्या रेड-बॉल फिटनेसचे मूल्यांकन केले जाईल कारण दुखापतीमुळे त्याने कसोटी संघात आपले स्थान गमावले आहे.
हेही वाचा : Zim vs SL : झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ घोषित! ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू
दक्षिण विभागः तिलक वर्मा, मौहम्मद अझरुद्दीन, तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायणकर जगदीशन, त्रिपुराण विजय, आर साई किशोर, तान्या त्यागराजन, विजयकुमार विशाक, निधिश एमडी, रिकी भुई, बासिल एनपी, एस गुरजा पंथनकर आणि एस.
पूर्व विभाग: अभिमन्यू इसवरन, संदिप पटनायक, विराट सिंग, दानिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्रा, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनिषी, सूरज सिंधू जैस्वाल, मुकेश कुमार, आकाश दीप आणि मोहम्मद शमी.
पश्चिम विभाग : शार्दुल ठाकूर, यशस्वी जैस्वाल, आर्य देसाई, हार्विक देसाई, श्रेयस अय्यर, सरफराज खान, रुतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले, शम्स मुलानी, तनुष कोटियन, धर्मेंद्रसिंह जडेजा, तुषार
देशपांडे, अर्जुन नागवासवाला.
उत्तर विभागः शुभम खजुरिया, अंकित कुमार, आयुष लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, आकिब नबी आणि कन्हैया वाधवन.
मध्य विभागः ध्रुव जुरेल, रजत पाटीदार, आर्यन जुयाल, दानिश मलेवार, संजीत देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चहर, सरांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठौर, हर्ष दुबे, मानव सुतार आणि खलील अहमद.
ईशान्य क्षेत्रः जोनाथन रोंगसेन, आकाश कुमार चौधरी, टेची डोरिया, युम्नम करंर्जित, सेदेझाली रूपेरो, आशिष थापा, हेम बहादूर छेत्री, जेहू अँडरसन, अर्पित सुभाष भटेवरा, फिरोजम जोतिन सिंग, पलजोर तमांग, अंकुर सिंग मलिक, अरबजित मलिक, अरब कुमार, अर्पित सुभाष भटेवरा, अजय सिंग.