
photo- social media
रजत पाटीदारचा संपूर्ण IPL प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. २०२२ च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. खरं तर, लिलावात विकला न गेल्याने त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाची तारीख ९ मे २०२२ अशी ठरली होती आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधीच त्याला माईक हेसन (तेव्हाचे आरसीबीचे प्रशिक्षक) यांचा फोन आला. RCB ने दुखापतग्रस्त यष्टीरक्षक लवनीत सिसोदियाच्या जागी त्याला संघात सामील केले. सुरुवातीला, लग्न रद्द करून संपूर्ण हंगाम बेंचवर बसावे लागेल या भीतीने रजतने आरसीबीची ऑफर नाकारण्याचा विचार केला. आपल्या कुटुंबाने समजूत घातल्यानंतर रजत पाटीदार आरसीबी संघात सामील झाला. त्याच क्षणापासून त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्याने नाबाद शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
२०२२ मध्ये पाटीदारने आठ सामने खेळत ३३३ धावा केल्या, ज्यात एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५४ चेंडूंमध्ये केलेल्या शानदार ११२ धावांचा समावेश होता. त्या हंगामात तो आरसीबीच्या सर्वात यशस्वी अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक ठरला. तसेच, तो आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला.
पाटीदार जेव्हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता, तेव्हा एका गंभीर दुखापतीमुळे त्याला २०२३ चा संपूर्ण हंगामातून बाहेर पडावे लागले. संपूर्ण हंगाम मुकणे हा एक मोठा धक्का होता. दुखापतीतून सावरल्यानंतर, त्याने हळूहळू आपली कारकीर्द पुन्हा उभारली. मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत हंगामानंतर, त्याने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सलामीवीर म्हणून २२ धावा केल्या. त्यानंतर त्याने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तीन सामन्यांमध्ये त्याने ६३ धावा केल्या. त्याने आयपीएल २०२४ मध्ये दमदार कमबॅक करत १५ सामन्यांमध्ये ३९५ धावा केल्या.
रजत पाटीदारच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट २०२५ मध्ये आला, जेव्हा आरसीबीचा संपूर्ण नेतृत्व संघ बदलत होता.संघाने फाफ डु प्लेसिसला संघातून मुक्त केले. तर, विराट कोहलीला खेळाडू म्हणून खेळत राहायचे होते. त्यानंतर आरसीबीने संघाची सूत्रे रजत पाटीदारकडे सोपवण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. संघाने त्याला ११ कोटी रुपयांना रिटेन ठेवले.
रजत पाटीदारने आरसीबीचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यासोबत मिळून, प्रत्येक विभागात मजबूत असलेला एक संघ तयार केला होता. प्रत्येक खेळाडूसाठी संघात आधीपासूनच पर्यायी खेळाडू होते. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांचा अनुभव, रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल यांची आक्रमक फलंदाजी, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड आणि जितेश शर्मा यांच्यासारखे फिनिशर्स, आणि अष्टपैलू कृणाल पांड्या यांच्यामुळे हा संघ अत्यंत शक्तिशाली दिसत होता. या संघात १७ वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा विराट कोहलीदेखील होता. याच संघाच्या जोरावर आरसीबीने १७ वर्षांचा दुष्काळ संपवून २०२५ मध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले आणि IPL 2026 मध्ये त्याने शानदार कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. रजत पाटीदारने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या दोन हंगामात सलग दोन विजेतेपदे जिंकणारा पहिला आयपीएल कर्णधार बनून इतिहास रचला.
IPL 2027 पूर्वी ‘या’ संघाच्या कर्णधारांचा होणार गेम; टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडमध्ये