या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघात सात मोठे बदल करण्यात आले आहेत. बाबर आझम सारख्या वरिष्ठ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, तर मोहम्मद रिझवान आणि हरिस रौफ सारख्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे.
रिझवानपूर्वी बाबर आझम एकदिवसीय कर्णधार होता, परंतु खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Pakistan: पाकिस्तानी संघातील खेळाडू एकजुटीने कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांच्या कर्णधाराचेही कोणतेही डाव यशस्वी होत नाहीत. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघात खेळाडूंच्या भूमिकेबाबत 'उलटं-सुलटं' परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये 14 संप्टेंबर रोजी सामना होणार आहे, नुकतीच झालेली वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघाला मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता पाकिस्तानी क्रिकेट संघामधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या साजिद खाने अलीकडेच एक टेलिव्हिजन मुलाखतीवर एक विधान केले आहे आणि या विधानाने क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडाली आहे.