फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रवी शास्त्री : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. यामध्ये आतापर्यत तीन सामने झाले आहेत आहेत यामध्ये दोन्ही संघानी एकएक सामना जिंकला आहे तर सामना ड्रॉ झाला आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात कमालीची कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये त्याचबरोबर तिसऱ्या सामान्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांचा घाम गाळला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने संघासाठी दोन्ही सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये देखील तो भारतासाठी मोठा खतरा असू शकतो.
ट्रॅव्हिस हेड गेल्या काही काळापासून भारतासाठी एक मोठी समस्या असल्याचे सिद्ध झाले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये हेडने आपल्या स्फोटक फलंदाजीने टीम इंडियाला त्रास दिला असे नाही तर या प्रकरणातील त्याचा इतिहास जुना आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२३ आणि वनडे वर्ल्ड कप फायनल २०२३ सारख्या महत्त्वाच्या प्रसंगी हेडने टीम इंडियाला खोल जखमा केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. जेव्हा तो संघासाठी फलंदाजी करत असतो तोपर्यत समोरचा संघाचा विजय जवळजवळ कठीण झालेला असतो. आता भारताचा शत्रू म्हणवल्या जाणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नवे नाव दिले आहे.
आयसीसी रिव्ह्यूच्या एका एपिसोडवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “कारण त्याचे नवीन नाव ट्रॅव्हिस हेडआ’ आहे.” हेडआ हा इंग्रजी शब्द आहे, ज्याचा अर्थ डोकेदुखी आणि ट्रॅव्हिस हेड हा डोके खरोखरच टीम इंडियासाठी डोकेदुखी बनले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये आतापर्यंत हेडने पाच डावांत फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याने तीन डावांत ८९, १४० आणि १५२ धावा केल्या आहेत.
IND vs AUS : रोहित शर्माला झाली दुखापत, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वाचा सविस्तर
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “ते भारतात बाम शोधत आहेत. पायाच्या समस्या, घोट्याच्या समस्या, अगदी डोकेदुखीसाठी ते बाम शोधत आहेत. यासाठी तो आदर्श आहे.” हेडच्या खेळातील सुधारणेबद्दल पुढे बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “मला वाटते की तो खूप हुशार आहे. तीन वर्षांपूर्वी मी जे पाहिले त्यावरून तो चांगलाच सुधारला आहे. विशेषत: तो ज्याप्रकारे शॉर्ट बॉल खेळतो. .तो सोडायला तयार आहे. तो बऱ्याच वेळा चांगले सोडायला शिकला आहे.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२४-२५ ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळली जाणार आहे. ही बॉक्सिंग डे कसोटी असेल. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन कसोटीनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.