फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : चॅम्पियन ट्रॉफीच्या मोठ्या वादानंतर आता स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मोठ्या गोंढळानंतर आता चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. आता २०२५ च्या चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यामध्ये मोठ्या वादानंतर आता आयसीसीने चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्याचवेळी, २३ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तानचा बहुप्रतिक्षित सामना होणार आहे.
प्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारताचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होणार आहेत आणि दिवस-रात्र सामने होणार आहेत. आयसीसी लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. अलीकडेच आयसीसीच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान २०२७ पर्यंत त्यांचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबई किंवा श्रीलंकेत खेळवले जाऊ शकतात. स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये पोहोचण्यात भारताला यश आले, तर त्याला ४ मार्चला उपांत्य फेरी खेळावी लागेल, तर स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्चला खेळवला जाणार आहे.
अ गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांग्लादेश
ब गट – अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड
MCA अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर पृथ्वी शॉ संतापला, इंस्टाग्रामवर स्टोरीवर दिली प्रतिक्रिया
१९ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी, भारत विरुद्ध बांगलादेश, तटस्थ
२१ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी, भारत विरुद्ध पाकिस्तान, तटस्थ
२४ फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध आफ्रिका, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२७ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
१ मार्च, इंग्लंड विरुद्ध आफ्रिका, कराची
२ मार्च, भारत विरुद्ध न्यूझीलंड, तटस्थ
४ मार्च, उपांत्य फेरी १, तटस्थ
५ मार्च, उपांत्य फेरी २, लाहोर
९ मार्च, अंतिम, तटस्थ/लाहोर
भारत नॉकआउट सामनेही तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत, जर भारत अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही तर हा सामना लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
अजूनपर्यत यासंदर्भात आयसीसीने अधिकृत माहिती दिलेली नाही त्यामुळे या वेळापत्रकामध्ये बदल केले जाऊ शकतात. पण ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार हे नक्की झाले आहे.