फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे सामने खेळत आहे. या मालिकेमध्ये सध्या १-१ अशी बरोबरी आहे. यामध्ये एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. या मालिकेचा पुढील चौथा सामना २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दोन्ही संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघाना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. यामध्ये जो संघ दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणार तो संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करताना जखमी झाला अशी माहिती आता समोर आली आहे. त्याच्या दुखापतीमुळे संघाची चिंता वाढली आहे. फलंदाजी करताना चेंडू त्याच्या डाव्या गुडघ्याला लागला, त्यानंतर तो बाहेर जाऊन बर्फाचा पॅक घेऊन बसला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. तोपर्यंत रोहित फिट होईल अशी आशा आहे.
🚨 Rohit Sharma was hit on his left knee during practice and was subsequently spotted icing it ahead of the #BoxingDayTest in Melbourne 👀#BorderGavaskarTrophy #BGT2024 #AUSvIND pic.twitter.com/uU6CqSDdzt
— Cricbuzz (@cricbuzz) December 22, 2024
रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. त्यावेळी रोहित भारतात होता आणि त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर त्याची पत्नी रितिकासोबत वेळ घालवत होते. ॲडलेड कसोटी सामन्यात त्याने पुनरागमन केले. मात्र, या सामन्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित अपयशी ठरला होता. त्याच्या बॅटमधून एकही धावा न आल्याने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जिंकू शकली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले आणि संघाला विजयापर्यंत नेले. आगामी कसोटी सामन्यांमध्ये जर रोहित शर्मा खेळाला नाही तर संघाची कमान जसप्रीत बुमराह सांभाळू शकतो. मात्र, रोहितची प्रकृती इतकी गंभीर नाही की तो सामन्यातून बाहेर आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी अजूनही चार दिवस शिल्लक आहेत.
या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने शानदार खेळ केला होता, पण रोहितच्या आगमनानंतर संघ आपल्या लयीत आला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाची अवस्था वाईट होती. यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यातही संघ खराब कामगिरीचा बळी ठरला. जसप्रीत बुमराह, आकाशदीप आणि रवींद्र जडेजा यांच्या खेळीने भारताकडून फॉलोऑनचा धोका कसातरी टळला आणि सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.