फोटो सौजन्य : IndianPremierLeague
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचा अहवाल : न्यू चंदीगढ येथे क्वालिफायर 1 चा सामना पार पडला. हा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स याच्यामध्ये खेळवण्यात आला. हा सामना पंजाब किंग्सच्या संघासाठी विसरण्यासारखाच होता. या सामन्यात पंजाबच्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिले गोलंदाजी करत राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाबच्या संघाला 101 धावांवर रोखले. या सामन्यात पंजाबच्या संघाने 2 विकेट्स घेतले. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्सच्या संघाला घरच्या मैदानावर पराभुत करुन 8 विकेट्सने विजय मिळवला आणि फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर विराट कोहलीने लवकर विकेट गमावली. विराटने आजच्या सामन्यात 12 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. त्यानंतर दुसरा विकेट बंगळुरुच्या संघाने गमावला हा म्हणजेच मयंक अग्रवाल याचा. मयंक अग्रवाल याने आजच्या सामन्यात 13 चेंडुमध्ये 19 धावा केल्या. या सामन्यात फिल्ल साॅल्टने कमालीची कामगिरी केली आहे. त्याने आजच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावले.
फिल्ल साॅल्ट याने आजच्या सामन्यामध्ये 27 चेंडुमध्ये 57 धावा केल्या यामध्ये त्याने 3 षटकार आणि 6 चौकार मारले. फिल्ल साॅल्टच्या जोरावर आजच्या सामन्यामध्ये संघाने 14.1 ओव्हरमध्ये लक्ष्य पुर्ण केले. संघाचा कर्णधार रजत पाटीदार फलंदाजीला आला होता त्याने 6 चेंडूमध्ये 15 धावा केल्या.
Say Hello to the first 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐈𝐒𝐓𝐒 of #TATAIPL 2025 ❤#RCB fans, how elated are you? 🤩
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/gmnjZsFWxF
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली. बंगळुरुच्या संघासाठी सुयश शर्माने संघाला तीन विकेट मिळवुन दिले. सुयशने मुशीर खान, शशांक सिंग आणि मार्कस स्टायनिस यांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर जोश हेझलवुड याने आजच्या सामन्यात पुनरागमन केले आणि त्याने आज संघाला तीन विकेट मिळवुन दिले. हेझलवुडने आजच्या सामन्यात तीन महत्वाच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने आजच्या सामन्यात जोश इंग्लिश, श्रेयस अय्यर आणि अजमतुल्ला उमरजाई यांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
संघासाठी 1 विकेट आजच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार याने घेतला तर यश दयाल याने संघाला आज 2 विकेट्स मिळवुन दिले. यश दयाल याने प्रिशांश आर्या आणि नेहल वढेरा यांनी विकेट घेतला.