फोटो सौजन्य : IndianPremierLeague
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या डावाचा अहवाल : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सध्या सामना सुरू आहे. या सामन्यात पंजाबच्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. आजच्या सामनात रजत पाटीदार ने पहिले नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबच्या संघाने पहिले फलंदाजी करत बंगळुरूच्या संघासमोर 102 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. पंजाब किंगच्या संघाने याआधी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध देखील अशीच प्रकारची फलंदाजी केली होती पण त्यावेळी त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती आणि त्यामुळे त्यांना त्या सामन्यात विजय मिळाला होता त्यामुळे आज गोलंदाजांची कामगिरी कशी राहील यावर चाहत्यांची नजर असणार आहे.
पंजाबच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर एकही सुरुवातीचा फलंदाज हा 20 चा आकडा पार करू शकला नाही. प्रियांश आर्या याने संघासाठी 5 चेंडू खेळले त्यामध्ये 7 धावा केल्या आणि विकेट गमावली. प्रियांश आर्या याची विकेट यश दयाल याने घेतली. पंजाबचा सलामीवीर फलंदाज प्रभसिमरण देखील विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यांना दहा चेंडू खेळल्याने 18 धावा करून भुवनेश्वर कुमारने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. मागील सामन्यात कमालीची कामगिरी करणारा जोश इंग्लिश देखील आजच्या सामन्यात फेल ठरला. त्याने सात चेंडू खेळल्या आणि चार धावा करून त्याला जोश हेझलवूडने पवेलियनचा रस्ता दाखवला.
PBKS vs RCB : फायनलचा सामना कोणाच्या नशिबी? रजत पाटीदारने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करणार
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस देखील आज काही विशेष कामगिरी करू शकला नाही त्याने या सामन्यात तीन चेंडू खेळले आणि दोन धावा करून बाद झाला. नेहल वढेरा याने 10 चेंडूंमध्ये आठ धावा केल्या तर शशांक सिंग यांनी पाच चेंडू मध्ये फक्त तीन धावा केल्या आणि सुयश शर्मा यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मुशीर खान हा फलंदाजीला आला पण तो तिसऱ्याच चेंडूवर एकही धाव न करता स्टंप आऊट झाला.
Innings Break! A perfect bowling display from #RCB bowlers derails #PBKS to 1⃣0⃣1⃣ Will Shreyas Iyer & his men defend this total & script history? Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#TATAIPL | #PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/HWY1RDJi9l — IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर जोश हेझलवुड याने आज तीन विकेट घेतले. त्याचबरोबर सुयश शर्माने देखील संघाला 3 विकेट्स मिळवुन दिले. यश दयालच्या होती 2 विकेट लागला. तर 1 विकेटस भुवनेश्वर कुमारच्या हाती लागला. त्याचबरोबर शफर्डने देखील संघाला 1 विकेट मिळवुन दिला.