Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम

RCB vs GT Weather Report: नरेंद्र मोदी स्टेडियम पुन्हा एकदा आयपीएल अंतिम सामन्याचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. जर पावसामुळे RCB vs GT फायनल सामना रद्द झाला, तर कोण होणार IPL 2026 चा चॅम्पियन? जाणून घ्या नियम

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 30, 2026 | 06:30 PM
RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम
Follow Us
Close
Follow Us:
  • पावसाने घातला खोळंबा तर काय?
  • सामना रद्द झाल्यास कोण बनेल IPL 2026 चॅम्पियन?
  • जाणून घ्या नियम
इंडियन प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना ३१ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आरसीबीने क्वालिफायर १ जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, तर गुजरातने क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.

French Open 2026 मध्ये महाउलटफेर! १९ वर्षीय फोन्सेकाने नोव्हाक जोकोविचचा केला गेम ओव्हर, २५ व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न भंगले

पाऊस पडला तर कोण होणार चॅम्पियन?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान पाऊस आल्यास, ३१ मे रोजी सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. सतत पाऊस पडत राहिल्यास, षटकांची संख्या कमी केली जाईल. पाऊस सुरूच राहिल्यास, अतिरिक्त १२० मिनिटे जोडली जातील. सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी प्रत्येक डावात किमान पाच षटके खेळवली जातील. जर सामना तरीही सुरू झाला नाही, तर तो ३१ मे रोजी होणार नाही. अशा परिस्थितीत, सामना रिझर्व्ह डेला, म्हणजेच १ जून रोजी खेळवला जाईल. सामना राखीव दिवशी, म्हणजेच १ जून रोजी, पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही, तर तो सामना रद्द घोषित केला जाईल. अशा परिस्थितीत, गुणतालिकेतील चांगल्या स्थानामुळे आरसीबीला विजेतेपद मिळेल.

RCB vs GT पिच रिपोर्ट

अहमदाबादमधील हवामान सामन्यासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान पावसाची कोणतीही शक्यता नाही. तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते, तर हलक्या वाऱ्यामुळे खेळाडूंना काहीसा दिलासा मिळू शकतो. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना मदत करणारी मानली जाते. येथे चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येत असल्यामुळे मोठ्या धावा पाहायला मिळतात. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त बाऊन्स आणि स्विंगची मदत मिळू शकते. जसजसा सामना पुढे जातो, तसतसे फिरकी गोलंदाजांनाही काही प्रमाणात टर्न मिळतो. या मैदानावर IPL 2026 मध्ये पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १८५ ते १९८ दरम्यान राहिली आहे. त्यामुळे फायनलमध्येही मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुजरात टायटन्सचा अहमदाबादमधील घरच्या मैदानावरील रेकॉर्ड मजबूत राहिला आहे. दुसरीकडे, आरसीबीने देखील याच मैदानावर २०२५ मध्ये विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे दोन्ही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहेत.

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

Web Title: Rcb vs gt final rain rule who will win ipl 2026 if match is abandoned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru

संबंधित बातम्या

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?
1

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
2

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

19 वर्षांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! Shubhman Gill ने केला ‘हा’ महाविक्रम; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद
3

19 वर्षांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! Shubhman Gill ने केला ‘हा’ महाविक्रम; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद

Vaibhav Sooryavanshi Reaction: मन तुटलं…हरल्यानंतर वैभवची पहिली भावूक प्रतिक्रिया, पहा वैभवची Insta Story
4

Vaibhav Sooryavanshi Reaction: मन तुटलं…हरल्यानंतर वैभवची पहिली भावूक प्रतिक्रिया, पहा वैभवची Insta Story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.