Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs GT Final: बंगळुरु-गुजरातमध्ये रंगणार अंतिम युद्ध, कोणाचं पारडं जड? कशी असेल संभाव्य प्लेइंग 11? जाणून घ्या

RCB vs GT IPL 2026 Final: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२६चा फायनल सामना रंगणार आहे. कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड अन् संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 31, 2026 | 01:24 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • बंगळुरु-गुजरातमध्ये रंगणार अंतिम युद्ध
  • कोणाचे पारडं जड?
  • कशी असेल संभाव्य प्लेइंग 11?
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु Royal Challengers Bengaluru आणि गुजरात टायटन्स Gujarat Titans यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महामुकाबला रंगणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली आहे. एका बाजूला विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ तर दुसऱ्या बाजूला शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स विजेतेपदासाठी सज्ज आहे. गतविजेता संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकणार की गुजरात बाजी मारणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघापैकी कोणाचं पारडं जड तसेच कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

French Open 2026 मध्ये महाउलटफेर! १९ वर्षीय फोन्सेकाने नोव्हाक जोकोविचचा केला गेम ओव्हर, २५ व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न भंगले

RCB vs GT खेळपट्टी अहवाल

आरसाबी आणि गुजरात यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी क्रमांक ६ वर अंतिम सामना खेळला जाईल. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जात आहे. येथे हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १८५ ते १९८ दरम्यान राहिली आहे. मात्र जसजसा सामना पुढे जाईल तसतसे फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरातचा होम ग्राउंड असला तरी हा स्टेडियम आरसीबीसाठीही तितकाच खास आहे, कारण त्यांनी २०२५ मध्ये याच मैदानावर आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते.

हवामानाचा अंदाज कसा?

अहमदाबादमध्ये सामन्यादरम्यान तापमान ३२ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याने पूर्ण ४० ओव्हरचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

हेड टू हेडमध्ये रेकॉर्ड?

आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या हंगामात दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले असून अंतिम सामन्यात दबाव कोण चांगल्या प्रकारे हाताळतो यावर निकाल ठरणार आहे.

संभाव्य प्लेइंग ११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, जेकब डफी

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

Web Title: Rcb vs gt ipl 2026 final pitch report weather head to head playing xi preview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.