Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs PBKS : बेंगलुरु संघाच्या विजयानंतर इचलकरंजीत हुल्लडबाजी; पाेलिसांकडून साैम्य लाठीमार

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीच्या संघाच्या विजयाप्रित्यर्थ इचलकरंजीत केलेल्या जल्लाेषाला गालबाेट लागले. काॅ. मलाबादे चाैकात मध्यरात्रीच्या सुमारास हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 04, 2025 | 09:31 PM
RCB Vs PBKS: Riots in Ichalkaranjit after Bengaluru team's victory; Police resort to lathicharge

RCB Vs PBKS: Riots in Ichalkaranjit after Bengaluru team's victory; Police resort to lathicharge

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : आयपीएल चषक विजेत्या बेंगलुरु संघाच्या विजयाप्रित्यर्थ इचलकरंजीत साजरा केल्या गेलेल्या जल्लाेषाला गालबाेट लागले. काॅ. मलाबादे चाैकात मध्यरात्रीच्या सुमारास जल्लाेषासह हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी पाेलिसांना साैम्य लाठीमार करावा लागला. तर काही संतप्त युवकांकडून पाेलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. तसेच दगडफफेकीत पाेलिस गाडीच्या काचा फूटून नुकसान झाले. यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला हाेता.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बेंगलुरू संघाने विजेतेपद मिळवल्यानंतर तरुणांचे जथ्थे जल्लाेष करत भागाभागातून माेटरसायकलवरून तसेच चालत माेठ्या संख्येने काॅ. मलाबादे चाैकात जमा झाले. जल्लाेष सुरू असताना या जल्लाेषाचे काही वेळानंतर हुल्लडबाजीत रुपांतर हाेऊ लागले. मध्यरात्री 12 नंतर काही अतिउत्साही युवकांना पाेलिसांनी साैम्य लाठीमार करत पांगवण्यास सुरूवात केली. त्यामुळे काही तरुण आणखी जाेराने आरडाओरडा करु लागले.

हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंडला मोठा झटका! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज पहिल्या सामन्याला मुकणार..

याच दरम्यान काही हुल्लडबाज तरुणांकडून पाेलिस गाडीवर दगड मारण्यात आला. युवकांना हटकले तरी ते जात नव्हते. यावेळी काही युवक जल्लाेष सुरूच ठेवणार असे सांगत पाेलिसांच्या अंगावर धावून गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पाेलिसांनी जादा कुमक मागवून युवकांना पांगवले.

हेही वाचा : Bangalore stampede : RCB च्या सेलिब्रेशन कुणाची शक्कल? बंगळुरू चेंगराचेंगरीवरुन राजकारण तापलं; सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा..

एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू

आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिले आयपीएल विजेतपद पटकावले.  १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे.  आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच चाहत्यांचा उत्साह  वाढला आणि यामध्ये गर्दी अनियंत्रित झाली. परिणामी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर हजारो चाहते  उपस्थित होते. एम. चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता ५० हजार प्रेक्षकांची असून  अशा परिस्थितीत चाहत्यांची संख्या वाढत होती. ज्यामुळे चाहते जबरदस्तीने स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. काही चाहते तर झाडावर चढून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील दिसून आले.

Web Title: Rcb vs pbks riots in ichalkaranjit after bengaluru teams victory police resort to lathicharge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 09:31 PM

Topics:  

  • Ichalkaranji
  • RCB Vs PBKS

संबंधित बातम्या

बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींना अटक; युट्युबवर व्हिडीओ पाहून नोटा छापायला शिकले, घरातच…
1

बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींना अटक; युट्युबवर व्हिडीओ पाहून नोटा छापायला शिकले, घरातच…

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…
2

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…

इचलकरंजी महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; 18 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दाेघांना ठोकल्या बेड्या
3

इचलकरंजी महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; 18 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दाेघांना ठोकल्या बेड्या

इचलकरंजी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा, नऊ जणांना अटक; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

इचलकरंजी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा, नऊ जणांना अटक; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.