इंग्लंड टीम (फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत या महिन्यात इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू गस अॅटकिन्सन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकत नाही.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गोलंदाज गस अॅटकिन्सनच्या उजव्या मांडीच्या स्नायूमध्ये ताण जाणवत असल्याने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणे संशयास्पद मानले जात आहे. गेल्या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान २७ वर्षीय अॅटकिन्सनला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत खेळू शकला नव्हता. तथापि, इंग्लंडने वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव करून मालिका सहज आपल्या खिशात टाकली होती.
अॅटकिन्सन तंदुरुस्त नसेल तर इंग्लंडसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण मार्क वूड आणि ऑली स्टोन, जोफ्रा आर्चर ही स्टार खेळाडू आधीच जखमी आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी इंग्लंडचे चार खेळाडू जखमी झालेले आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंड कोणती रणनीती आखणार याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
भारत आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होणारा आहे. पहिला सामना लीड्समध्ये सुरू होणार आहे. त्याच वेळी, दुसरी कसोटी २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार आहे. तिसरी कसोटी १० जुलैपासून लॉर्ड्सवर, चौथी २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये आणि पाचवी कसोटी ३१ जुलैपासून द ओव्हलवर खेळवली जाणार आहे.
हेही वाचा : Bengaluru Stampede: “मी पोलिसांना दोष…”; चेंगराचेंगरीत १० जणांच्या मृत्यूवर काय म्हणाले डि. के. शिवकुमार?
रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीनंतर, बीसीसीआयकडून नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराची जबाबदारी सोपवली आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता बनला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.