Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मागील वर्षीपेक्षा आमचा PBKS संघ…”; GT विरुद्धच्या सामन्याआधी Ricky Ponting चे मोठे विधान

आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगडमध्ये सामना होणार आहे. भारताचे युवा खेळाडू असलेले शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर आमने-सामने येणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 04:45 PM
“मागील वर्षीपेक्षा आमचा PBKS संघ…”; GT विरुद्धच्या सामन्याआधी Ricky Ponting चे मोठे विधान
Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्सचा हेड कोच रिकी पॉटिंगची प्रतिक्रिया
मागील वर्षीपेक्षा ताकदवान संघ असल्याचे भाष्य 
आज पंजाब विरुद्ध गुजरात असा रंगणार सामना

Tata IPL Ricky Ponting: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. 28 मार्चपासून आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला. आज या पर्वामधील चौथा सामना होणार आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगडमध्ये सामना होणार आहे. भारताचे युवा खेळाडू असलेले शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर आमने-सामने येणार आहेत. दरम्यान पंजाब किंग्सचा हेड कोच रिकी पॉटिंगने आपल्या संघाबाबत भाष्य केले आहे, ते जाणून घेऊयात.

रिकी पॉटिंगने आपल्या पंजाब किंग्स संघाबाबत मोठे विधान केले आहे. आमचा संघ मजबूत आणि ताकदवान असल्याचे रिकी पॉटिंगने म्हटले आहे. गेल्या हंगामात आमचा संघ गुणतालिकेत सर्वात वरच्या स्थानावर होता. आमच्यासाठी चांगली गोष्ट असली तरी यावर्षी आम्ही नव्या मानसिकतेने सुरुवात करणार आहोत. आता आम्हाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, असे हेड कोच रिकी पॉटिंगने सांगितले.

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?

आमच्याकडे प्रत्येक भूमिकेसाठी आता अनेक पर्याय आहेत. यावेळेस आमचा संघ अधिक मजबूत स्थितीत आहे. संघातील अनेक खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळत आहे. अंतिम 11 खेळाडू निवडत असताना तेथील परिस्थितीशी जुळवून घेणं आवश्यक असणार आहे. आम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल. घरच्या मैदानावर उत्तम कामगिरी करावी लागेल. मागील वर्षीपेक्षा आमचा संघ अत्यंत मजबूत आहे, असे रिकी पॉटिंगने विधान केले आहे.

टॉस ठरणार ‘बॉस’

आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचा सामना पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. दरम्यान या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज यांच्यासाठी फायदेशीर असेल हे आपण जाणून घेऊयात.

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरू शकते. या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील केवळ दोन ते तीन वेळेसच 200 धावांचा टप्पा पार झाला आहे. 160 ते 180  अशी धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे केली आहे. आज येथील हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.

 

Web Title: Ricky ponting big statement for pbks before gujrat titans ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Gujrat Titans
  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Ricky Ponting

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.