Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 लिलावाआधी ट्विस्ट! Mumbai – Punjab मध्ये पडद्यामागे सर्वात मोठी डील; हार्दिक-अर्शदीपच्या ट्रेडवर शिक्कामोर्तब होणार?

Hardik Pandya-Arshdeep Singh Trade near Completion IPL 2027: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात हार्दिक पांड्या- अर्शदिप सिंगच्या ट्रेडचा चा करार जवळपास निश्चित मानले जात आहे. या कराराबाबत येत्या काही दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 08, 2026 | 04:37 PM
Hardik Pandya-Arshdeep Singh Trade

Hardik Pandya-Arshdeep Singh Trade

Follow Us
Follow Us:
  • IPL 2027 मध्ये मोठा उलटफेर
  • मुंबई-पंजाबमध्ये ट्रेड डील फिक्स?
  • लवकरच फ्रेंचायझी करणार घोषणा?
IPL 2027: आयपीएल २०२७ आधी प्रत्येक संघात मोठे बदल केले जात आहे. तसेच, त्याआधी मिनी लिलावासाठी फ्रँचायझींची तयारी सुरु झाली आहे. फ्रँचायझींनी , रिटेन ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी १७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी, सर्व संघांमध्ये खेळाडूंच्या ट्रेड डीलची चर्चा सुरू आहे. सध्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील ट्रेड डील सर्वाधिक चर्चेत आहे. वृत्तानुसार, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्यात ट्रेड होण्याची दाट शक्यता आहे. पांड्या आता पंजाब किंग्सकडून खेळू शकतो. तर, अर्शदीप सिंग देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसू शकतो.

टीम इंडियात मोठा बदल, Rising Stars Asia Cup मधून Rajat Patidar ची माघार; रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची धुरा

पंजाब- मुंबईमध्ये होणार मोठी ट्रेड डील

क्रिकबझच्या नवीन वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील करार जवळपास निश्चित झाला आहे. फ्रँचायझींनी आता हा करार अंतिम केला असून बीसीसीआयला पत्र पाठवले आहे. परंतु, खेळाडूंमध्ये पैशांसंदर्भात चर्चा होणे बाकी आहे, त्यानंतर करारावर स्वाक्षरी करून त्याची घोषणा केली जाऊ शकते. सोशल मीडियानुसार, या कराराची अधिकृत घोषणा ७२ तासांच्या आत केली जाऊ शकते. मात्र, सध्या दोन्ही संघ या व्यवहारात प्रत्येकी एकाच खेळाडूचा विचार करत आहेत.

वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्याच्या आगमनाने पंजाब किंग्स संघाला एक भारतीय वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू मिळेल. मात्र, पांड्या या संघात केवळ एक खेळाडू म्हणून खेळेल. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचे कर्णधारपद कायम राखण्याची शक्यता आहे. अय्यर सध्या टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचेही कर्णधारपद भूषवतो.

मुंबई इंडियन्सचा संघ होईल अधिक मजबूत

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी कमजोरी त्यांची गोलंदाजी होती. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इतर गोलंदाजांकडून साथ मिळत नव्हती. अर्शदीप सिंगच्या संघात समावेशामुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजी आणखी मजबूत होऊ शकते. तसेच, त्यांना ट्रेंट बोल्टला अंतिम ११ मध्ये खेळवण्याची गरज भासणार नाही. यामुळे संघ व्यवस्थापन विल जॅक्सला अष्टपैलू म्हणून खेळवू शकतो. मात्र, मुंबई संघ कॉर्बिन बॉशला आपला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून कायम ठेवेल.

मात्र, या ट्रेडनंतर मुंबई इंडियन्सला नवीन कर्णधार शोधावा लागेल. सध्या माजी कर्णधार रोहित शर्मा या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसते. तिलक वर्मा याचीही संघाच्या नवीन उपकर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते. सध्या, मुंबई संघ भविष्याचा विचार करून आपल्या संघाची तयारी करत आहे.

IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा मोठा डाव! दोन खेळाडूंचा पत्ता कट होणार? सिराजच्या कमबॅकची तयारी

Web Title: Ipl 2027 hardik pandya arshdeep singh trade mumbai indians punjab kings pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Hardik Pandya
  • IPL 2027
  • mumbai indians
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा मोठा डाव! दोन खेळाडूंचा पत्ता कट होणार? सिराजच्या कमबॅकची तयारी
1

IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा मोठा डाव! दोन खेळाडूंचा पत्ता कट होणार? सिराजच्या कमबॅकची तयारी

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा
2

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर
3

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?
4

IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.