ऋषभ पंत (फोटो- ट्विटर)
भारत विरुद्ध श्रीलंकेच्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला २८४ वर ऑल आउट केले होते. तेव्हा भारताकडे १७८ रन्सची आघाडी होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि देवदत्त पडीकलच्या खेळीच्या जोरावर भारताने ३५५ रन्सची बलाढ्य आघाडी घेतली आहे. त्यातच ऋषभ पंतने शानदार ६६ रन्सची अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्स मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने वेगवान १०० सिक्स मारले आहेत. त्याने आपले अर्धशतक देखील सिक्स मारून पूर्ण केले. ऋषभ पंत हा जगातील चोथा आणि पहिला भारतीय फलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्सचा रेकॉर्ड केला आहे.
IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड
ऋषभ पंतने ६६ रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने ८ फोर आणि २ सिक्स मारले. तर पहिल्या डावात त्याने ३९ रन्सची खेळी केली होती. त्याने दुसऱ्या डावात केलेल्या शानदार अर्धशतकामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे फलंदाज
| फलंदाज | देश | कसोटी सामने | एकूण षटकार |
| बेन स्टोक्स | इंग्लंड | ११०+ | १३८ |
| ब्रँडन मॅक्क्युलम | न्यूझीलंड | १०१ | १०७ |
| ॲडम गिलख्रिस्ट | ऑस्ट्रेलिया | ९६ | १०० |
| ऋषभ पंत | भारत | ५१ | १०० |
IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला



