IPL 2025: What is this game of Rishabh Pant? He forcibly pushed Kuldeep out of the crease, made a stump..; Watch Video
IPL 2025 : 18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात विशाखापट्टणमधील डॉ वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिट्ल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर धावांचे 210 आव्हान उभे केले होते. आशुतोष शर्माच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने आव्हान सहज पूर्ण केले. या दरम्यान ऋषभ पंत कुलदीप यादवसोबत मस्ती करताना दिसला.
ऋषभ पंतने लखनौ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीसह आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळताना दिल्लीविरुद्ध चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. प्रथम फलंदाजी करताना तो फार काही करू शकला नाही. परंतु त्याने नंतर गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात स्टंपिंग केले नाही, त्यामुळे लखनौ संघाने आपल्या हातातील जिंकलेला सामना गमवावा लागला. मात्र, या सामन्या दरम्यान पंतने असे काही कृत्य केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना खेळला गेला, ज्यामध्ये दिल्लीने शेवटच्या षटकात लखनौचा 1 गडी राखून पराभव केला आणि आयपीएलमधील इतिहासात एक धामकेदार विजय मिळवत त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली. अखेरच्या क्षणांमध्ये सामना खूपच रोमांचक वळणावर अआला होता. दोन्ही संघांवर दबाव होता कारण सामना दोन्ही बाजूने झुकण्याची शक्यता होती. दोन्ही डगआऊटमधील वातावरण दबावाचेच होते. मात्र, या सगळ्यामध्ये ऋषभ पंत आणि कुलदीप यादव वेगळीच मस्ती करताना दिसून आले.
हेही वाचा : IPL 2025 : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम; ‘त्या’ लाजिरवाण्या यादीत पटकावलं पहिलं स्थान…
हार जीत तो लगी रहती है पर मस्ती नहीं रुकनी चाहिए
क्या लगता है कुलदीप यादव को आउट दे दिया गया होगा..!!#DCvsLSG #DelhiCapitals pic.twitter.com/LBuocdRdGC— Mulayam Yadav🇮🇳❤️ (@KR_Mulayamyadav) March 25, 2025
पंत आणि कुलदीपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंत कुलदीपला क्रीजच्या बाहेर ढकलताना दिसत आहे. लखनौसाठी रवी बिश्नोई 18 वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवचा फटका बसला नाही आणि चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे गेला, त्याने चेंडू स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला. पण नंतर कुलदीपने आपला तोल गमावला, तरी त्याने स्वत: ला क्रीजमध्ये ठेवण्याचा प्रयनत केला.
त्यानंतर ऋषभ पंतने गंमतीने यादवला क्रीजच्या बाहेर ढकलले आणि बेल्स उडवले. दोघांमधील हा मजेदार प्रसंग सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून चाहते म्हणत आहेत की, ‘काहीही झाले तरी पंतची मजा कधीच थांबत नाही’.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत निकोलस पूरन (७५) आणि मिचेल मार्श (७२) यांच्या वेगवान खेळीमुळे एलएसजीने दिल्ली कॅपिटल्सला २१० धावांचे टार्गेट दिले. खराब सुरुवात होऊन देखील हा सामना जिंकण्यात दिल्लीने यश मिळवले. आशुतोष शर्माने वेगवान (66*) खेळी करत शेवटच्या षटकात षटकार ठोकला आणि दिल्ली कॅपिटल्सने 3 चेंडू आणि एक विकेट शिल्लक असताना सामना जिंकला.