Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

LSG Action on Captain Rishabh Pant: लखनौ सुपर जायंट्सचे टीम डायरेक्ट टॉम मूडी यांनी संघात मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे ऋषभ पंतची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 24, 2026 | 08:03 PM
photo- social mredia

photo- social mredia

Follow Us
Follow Us:
  • LSG चा फ्लॉप हंगाम
  • ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार?
  • टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
आयपीएल २०२६ हे ऋषभ पंतसाठी एक वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हते. या हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाची कामगिरी ही निराशाजनक होती. सलग तिसऱ्या हंगामात लखनौ प्लेऑफमध्ये क्वालिफाय करु शकला नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौने १४ पैकी फक्त ४ सामने जिंकले. ते ८ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहेत. यामुळे पंतच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एलएसजीच्या खराब कामगिरीनंतर, संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी पुढील हंगामासाठी संघामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे पंतचा कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

KKR vs DC Live: नशिबाचा खेळ! राजस्थानच्या निकालावर ठरणार कोलकात्याचं भवितव्य, टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

पंतच्या नेतृत्वावर टॉम मूडीचे वक्तव्य

पंजाब किंग्सकडून झालेल्या पराभवानंतर टॉम मूडी पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘आम्ही या संपूर्ण हंगामातील कामगिरीवर शांत डोक्याने विचार करू. आम्ही आमच्या स्तरानुसार कामगिरी केली नाही. भविष्यात संघाचे नेतृत्व कसे असेल याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. असे दिसते की आम्हाला नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे.’ यावरून हे स्पष्ट होते की एलएसजी व्यवस्थापन आता केवळ संघाच्या रचनेवरच नव्हे, तर कर्णधारपदावरही एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

‘कर्णधारपदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, पंतसाठी हा हंगाम निश्चितच आव्हानात्मक होता आणि ते निकालांमध्ये दिसून येत आहे. या दबावाचा त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीवर परिणाम होत आहे का, याचा विचार करणे महत्वाचे आहे. मला माहित आहे की हा हंगाम आमच्यासाठी कठीण होता, पण आम्ही त्यावर सखोल विचार करू, वेळ घेऊ आणि प्रत्येक गोष्ट समजण्याचा प्रयत्न करु.’ असे टॉम मूडी यांनी सांगितले.

पंतची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार?

ऋषभ पंतकडून आधीच भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. पंत आता लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपदही गमावू शकतो. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने पंतला २७ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर, कर्णदारपदाची धुरा त्याच्या हाती सोपवण्यात आली होती, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्स सलग दोन वर्षे प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. आयपीएल २०२५ मध्ये, पंतने पहिल्यांदा लखनौचे कर्णधारपद भूषवले होते. तेव्हा संघ सातव्या स्थानावर राहिला होता. पंतच्या कर्णधारपदाखाली, फ्रँचायझीने दोन हंगामात २८ पैकी केवळ १० सामने जिंकले.

आयपीएल २०२६ मध्ये लखनौकडून खेळताना पंतने १४ सामन्यांमध्ये १३८.०५ च्या सरासरी स्ट्राइक रेटने केवळ ३१२ धावा केल्या. या काळात त्याने फक्त एकदाच ५० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएल २०२५ मध्ये पंतची कामगिरी त्याहूनही खराब होती. त्या हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये केवळ २६९ धावा केल्या. वृत्तानुसार, यामुळेच त्याचे संघातील स्थान आणि कर्णधारपद दोन्ही धोक्यात आले असून टीम मॅनेजमेंट कर्णधारपदावरुन पंतची हकालपट्टी करु शकते.

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

Web Title: Rishabh pant lsg captaincy under threat tom moody big statement ipl 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Lucknow Super Giants
  • Rishabh Pant
  • Rishabh Pant news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.