MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट
सचिन तेंडुलकरने अर्जुनसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहिले की, ‘शाब्बास, अर्जुन’. ‘या हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळले आहेस, त्याचा मला अभिमान आहे. तू नेहमी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला, संयम ठेवला, शांतपणे काम केलेस आणि शेवटच्या सामन्यापर्यंत तुझ्या संधीची वाट पाहूनही तू सकारात्मक राहिलास. क्रिकेट कौशल्याइतकीच संयमाचीही परीक्षा घेतो आणि आज तू या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हाताळल्या. जमिनीवर पाय ठेव आणि नेहमीप्रमाणेच खेळावर प्रेम करत राहा.’ सचिनची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.
Well done, Arjun. ❤️
Proud of the way you’ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.
Cricket tests patience as much… pic.twitter.com/3RdiGkXbfT — Sachin Tendulkar (@sachin_rt) May 23, 2026
आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडल्यानंतर, संघाने अर्जुन तेंडुलकरला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पदार्पणाची संधी दिली. अर्जुनने फलंदाजी करताना पाच चेंडूंमध्ये पाच धावा केल्या, पण त्याने आपल्या गोलंदाजीने अधिक प्रभावित केले. या डावखुरा वेगवान गोलंदाजाने चार ओव्हरमध्ये ३६ धावा देऊन एक विकेट घेतला. अर्जुनने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये प्रभसिमरन सिंगची विकेट घेतली असती, पण कर्णधार ऋषभ पंतने एक सोपा झेल सोडला. मात्र, अर्जुनने हार मानली नाही आणि आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये एक अप्रतिम यॉर्कर टाकून प्रभसिमरन सिंगला पायचीत (LBW) केले.
शनिवारी (दि.२३) पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना जिंकला. ईकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला ७ विकेट्सने पराभूत करून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद शतक झळकावत पंजाब किंग्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयामुळे पंजाब किंग्स सध्या १५ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाने १४ पैकी ७ सामने जिंकले असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पंजाबचे प्लेऑफमधील स्थान आता राजस्थान रॉयल्सवर अवलंबून आहे.
IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral






