Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs CSK : 17 वर्षांनंतर कोण ठरला CSK च्या पराभवाचा खलनायक? ऋतुराज गायकवाडने मांडली सारीच व्यथा..

आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. 8 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला 18 वर्षानंतर पराभूत केले आहे. या सामन्यातील पराभवाबाबत सीएसकेचा कर्णधार व्यक्त झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 29, 2025 | 09:44 AM
RCB vs CSK: After 17 years, who became the villain of CSK's defeat? Rituraj Gaikwad expressed all his pain..

RCB vs CSK: After 17 years, who became the villain of CSK's defeat? Rituraj Gaikwad expressed all his pain..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs CSK : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आयपीएल 2025 मधील 8 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये (दि. 28 मार्च)  पडला. हा सामना चेपॉक स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला बंगळुरूने 50 धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. याआधी म्हणजे 2008 मध्ये आरसीबीने सीएसकेचा पराभव केला होता. या पराभवाबाबत सीएसकेचा कर्णधार व्यक्त झाला आहे.

चेपॉकमधील आयपीएल सामन्यातमध्ये सतरा वर्षांनंतर झालेल्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाडची वेदना बाहेर आली. आरसीबीकडून  चेन्नई सुपर किंग्जला पराभव स्वीकारावा लागला. तर सीएसकेच्या कर्णधाराने या सामन्यात आपल्या संघाला पराभवाचा सामना का करावा लागला? याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आरसीबीच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदारने अर्धशतक लगावत संघाला 196 धावांपर्यंत पोहचवले. तर चेन्नईला 146 धावांपर्यंतच मजल मारता आली.

हेही वाचा : IPL 2025 : CSK विरुद्ध Virat Kohli च ‘किंग’, शिखर धवनचा विक्रम मोडत रचल ‘हा’ इतिहास

2008 नंतर आरसीबीकडून सीएसकेचा पहिला पराभव..

चेन्नईला 2008 नंतर आरसीबीकडून त्यांच्या घरच्या मैदानावर  पहिला पराभव करण्यात आला. या पराभवानंतर रुतुराज गायकवाड म्हणाला की, मला अजूनही वाटते की या मैदानावर 170 धावांची धावसंख्या योग्य होती. येथे फलंदाजी करणे अवघड होते. खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्ही आमचा सामना गमावला आहे. तो पुढे म्हणाला की, जर तुम्ही 170 धावांचा पाठलाग करत असता तर तुम्हाला आणखी काही वेळ मिळू शकला असता.असे गायकवाड म्हणाला.

पराभवाचा खलनायक कोण?

पॉवरप्लेमध्ये  20 जादा धावा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने खेळण्याची गरज  होती. जिथे आम्ही खेळू शकलो नाही. सीएसकेचा कर्णधार म्हणाला की, आम्ही अनेक झेल सोडले आणि त्यांचे फलंदाज चौकार आणि षटकार मारत राहिले. शेवटच्या षटकापर्यंत त्यांचा वेग काही कमी झाला नाही. आम्हाला वाटतं की आम्हाला क्षेत्ररक्षणावर खूप मेहनत करण्याची गरज आहे.

हेही वाचा : IPL 2025 : MS Dhoni ने CSK साठी केला भीम पराक्रम, आपल्याच खास मित्राचा विक्रम मोडला

आरसीबीचा कर्णधार ठरला सामनावीर..

आरसीबीकडून 51 धावांची खेळी करणारा कर्णधार रजत पाटीदार सामनावीर म्हणून गौरवीला गेला. पाटीदार म्हणाला की, या मैदानावर ही चांगली धावसंख्या होती, कारण येथे चौकार आणि षटकार मारणे सोपे नव्हते. चेपॉकमधील 17 वर्षांनंतरच्या विजयाबद्दल तो म्हणाला की येथे जिंकणे नेहमीच खास असते. कारण, चेन्नईचे चाहते त्यांच्या संघाला वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करत असतात.

आरसीबीकडून सीएसकेचा धुव्वा..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. यावेळी आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ससमोर 196 धावांचे आव्हान देण्यात आले होते. परंतु, चेन्नईचा संघ 20 षटकात केवळ 146 धावा करू शकला आणि या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाचा बंगळुरूने 50 धावांनी पराभव केला. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपुष्टात आला.

 

Web Title: Rituraj gaikwad reveals the reason for csks success rcb vs csk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • CSK vs RCB
  • IPL 2025
  • KKR vs RR
  • MS Dhoni Captain
  • Rajat Patidar
  • Ruturaj Gaikwad
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
3

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
4

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.