एम एस धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला बंगळुरूने 50 धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले. आरसीबीने याआधी म्हणजे 2008 मध्ये चेपॉकवर सीएसकेचा पराभव केला होता. त्या नंतर काल 28 मार्चला आरसीबीने सीएसकेचा पराभव केला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु अशातच सीएसकेने सामना गमावला तरी माजी कर्णधार एम एस धोनीने मात्र एक सीएसकेसाठी एक इतिहास रचला आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 30 धावांची नाबाद खेळी केली. या खेळी दरम्यान धोनीने सुरेश रैनाचा एक विक्रम मोडला. एमएस धोनीने आरसीबीविरुद्ध 30 धावा केल्यानंतर चेन्नईसाठी त्याच्या खात्यावर 4699 धावा जमा झाल्या आणि त्याने सीएसकेसाठी सर्वाधिक धावा काढणाऱ्या सुरेश रैनाचा 4687 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. असे करणारा तो एकमेव पहिला फलंदाज ठरला.
या विक्रमाबरोबर धोनी आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. सुरेश रैनाचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला केवळ 19 धावांची गरज होती आणि त्याने सीएसकेच्या डावाच्या 20 व्या षटकात षटकार मारून ही कामगिरी आपल्या नावे केली.
हेही वाचा : MI vs GT : आयपीएलमध्ये राशिद खानविरुद्ध सूर्यकुमार यादव हिट की फ्लॉप? आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवारी सीएसके आणि आरसीबी यांच्यात सामना रंगला होता. यामध्ये आरसीबीने बाजी मारली यानी सीएसकेला पराभवाचा सामान्य करावा लागला. आयपीएल 2025 मधील हा सामना हा धोनीचा चेन्नई-आधारित फ्रँचायझीसाठी 236 वा सामना होता आणि त्याने या सामन्यात त्याने सीएसकेसाठी सर्वाधिक 4699 धावा केल्या. सुरेश रैनाने सीएसकेसाठी 176 आयपीएल सामन्यांमध्ये 4687 धावा करत आपल्या आयपीएल कारकिर्दीला रामराम केला होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. यावेळी आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ससमोर 196 धावांचे आव्हान दिले होते. परंतु चेन्नईचा संघ 20 षटकात केवळ 146 धावा करू शकला आणि या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाचा बंगळुरूने 50 धावांनी पराभव केला. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले.