विराट कोहली(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. आयपीएल 2025 मधील हा 8 वा सामना होता. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 50 धावांनी पराभूत केले. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा इतिहास रचून आपणच इथले ‘किंग’ दाखवून दिले आहे. तारांकित फलंदाज विराट कोहलीने एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात 31 धावा करत आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा मोठा विक्रम आपल्या नवे केला.
विराट कोहलीच्या आधी हा विक्रम शिखर धवन या गब्बरच्या नावावर होता. शिखर धवनने अनेक फ्रँचायझींकडून खेळताना 29 सामन्यांत 1057 धावा करून हा विक्रम प्रस्थापित केला होता. आज कोहलीने 31 धावांची खेळी करत शिखर धवनला मागे सोडलेअ आहे. आज तो चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक 1084 धावा करणारा फलंदाज बनला आहे.
सीएसकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर झाला आहे. तसेच सर्वाधिक फ्रँचायझींविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे. तो राजस्थान रॉयल्स (764), दिल्ली कॅपिटल्स (1057) आणि आता सीएसके विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. यावेळी आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ससमोर 196 धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार रजत पाटीदारच्या 51 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने २० षटकांत 7 गडी गमावून 196 धावांपर्यंत पोहचू शकली. तसेच पाटीदार व्यतिरिक्त फिल सॉल्टने देखील 16 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. तसेच विराट कोहलीने 30 चेंडूचा सामना करत 31 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने देखील 14 चेंडूत 27 धावांची खेळी केली आणि शेवटी टीम डेव्हिडने अवघ्या 8 चेंडूत 22 धावा चोपून तो नाबाद राहीला.
हेही वाचा : IPL 2025 : MS Dhoni ने CSK साठी केला भीम पराक्रम, आपल्याच खास मित्राचा विक्रम मोडला
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला 20 षटकात केवळ 146 धावाच करता आल्या आणि या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाचा बंगळुरूने 50 धावांनी पराभव केला. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले. तर सीएसकेने गोलंदाजीसह फलंदाजीत ढिसाळ कामगिरी केली. त्याचा फटका संघाला बसला आणि आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला.