Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तो थोडा जास्तच खेळत…” जुना मित्र गंभीरच्या बचावासाठी उतरला मैदानात! गरळ ओकणाऱ्यांना दिला सल्ला 

दक्षिण आफ्रिके पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्याने भारतीय संघ आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता मात्र गौतम गंभीरला पाठिंबा देण्यासाठी रॉबिन उथप्पा पुढे आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 19, 2025 | 06:33 PM
"He's playing a little too much..." Old friend comes to Gambhir's defense! Advice for those who are complaining

"He's playing a little too much..." Old friend comes to Gambhir's defense! Advice for those who are complaining

Follow Us
Close
Follow Us:

Gautam Gambhir’s defense from Robin Uthappa : दक्षिण आफ्रिके पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर, भारतीय संघ आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या कसोटीतील लज्जास्पद कामगिरीमुळे भारतीय संघाला ३० धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे कोचिंग युनिटच्या रणनीतींबद्दल सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. फलंदाजीपासून ते संघ संयोजनापर्यंत प्रत्येक निर्णय आता तपासाच्या अधीन आहे.

हेही वाचा : ICC ODI Ranking : हिटमॅन साम्राज्य खालसा! डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा; अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा दुसराच फलंदाज

गंभीरला माजी सहकाऱ्याचा पाठिंबा

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाभोवती अनेक प्रश्न वाढले आहेत. त्याचा माजी सहकारी आणि केकेआरचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा आता गौतम गंभीरच्या समर्थनात मैदानात उतरला आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघाची कसोटी क्रिकेटवरील पकड कमकुवत झाली आहे, ज्यामुळे आणखी टीका होण्यास सुरुवात झाली आहे.  दरम्यान, सोशल मीडिया आणि त्याच्या यूट्यूब चॅनेलवर उथप्पाने गंभीरवरील टीका ही अन्याय्य असल्याचे म्हटले आहे.

प्रशिक्षक थोडे जास्तच खोलवर…

रॉबिन उथप्पा यांनी गौतम गंभीरचा बचाव करताना म्हटले की, “मी काल एक टिप्पणी पाहिली ज्यामध्ये बोलण्यात आले होते की, ‘मी जीजीचा बचाव करत आहे.’ ‘यार, प्रशिक्षक थोडे जास्तच खोलवर खेळत आहेत.’ आपण निकाल पाहत असतो आणि प्रशिक्षकाला दोष देत असतो, परंतु तुम्हाला एकूण चित्र पहावे लागणार आहे.” उथप्पाबद्दल बोलताना, तो स्वतः बराच काळ केकेआर संघाचा भाग राहिला आहे आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

भारताचा दारुण पराभव

पहिल्या कसोटीत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली  होती. भारतीय संघ १२४ धावांचे माफक लक्ष्य देखील  गाठू शकला नाही आणि दुसऱ्या डावात धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. फलंदाजांचे खराब तंत्र आणि खराब शॉट निवड ही संघाच्या पराभवाची मुख्य कारणे ठरली आहेत. केएल राहुलने पहिल्या डावात भारतासाठी सर्वाधिक ३९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने संयमाने खेळ केला आणि ९२ चेंडूत ३१ धावा उभ्या केल्या.  पण ही खेळीही संघाला विजयापर्यंत पोहचवण्यास अपयशी ठरली.  एकाही भारतीय फलंदाजाने अर्धशतक पूर्ण केले नाही, जे संघाच्या फलंदाजीच्या अपयशाचा मोठा दाखलाच ठरला.

हेही वाचा : IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर

 

Web Title: Robin uthappa comes to gautam gambhirs defence after indias defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • Ind Vs Sa
  • IND vs SA Test
  • Robin Uthappa

संबंधित बातम्या

IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर 
1

IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर 

IND VS SA 2nd Test : सुदर्शन, ज्युरेलचा खास सराव! सिंगल पॅड घालून गेले फिरकीला सामोरे; पर्यायी सत्रात दोघांनी गाळला घाम
2

IND VS SA 2nd Test : सुदर्शन, ज्युरेलचा खास सराव! सिंगल पॅड घालून गेले फिरकीला सामोरे; पर्यायी सत्रात दोघांनी गाळला घाम

Rohit Sharma इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेचे नेतृत्व ‘हिटमॅन’कडे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Rohit Sharma इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेचे नेतृत्व ‘हिटमॅन’कडे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IND vs SA 2nd Test : गुवाहाटी कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला दुहेरी झटका! ‘हे’ स्टार गोलंदाज जखमी; वाचा सविस्तर 
4

IND vs SA 2nd Test : गुवाहाटी कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला दुहेरी झटका! ‘हे’ स्टार गोलंदाज जखमी; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.