रोहित शर्मा आणि डॅरिल मिशेल(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : IND vs SA : गुवाहाटीच्या लाल खेळपट्टीवर भारत कुणाला देणार संधी? कोणती असेल प्लेइंग-11? वाचा सविस्तर
डॅरिल मिशेल हा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा दुसरा किवी खेळाडू ठरला आहे. मिशेलच्या आधी, ग्लेन टर्नर १९७९ मध्ये पुरुषांच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते. असे करणारा तो पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू बनला होता. यासह, रोहित शर्माचे २२ दिवसांचे राज्य आता खालसा झाले आहे. मिशेलने दोन स्थानांनी प्रगती करत अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान आणि भारताचा रोहित शर्मा यांना मागे टाकत पहिले स्थान प्राप्त केले आहे.
न्यूझीलंडचा संघातील मार्टिन क्रो, अँड्र्यू जोन्स, रॉजर टूस, नॅथन अॅस्टल, केन विल्यमसन, मार्टिन गुप्टिल आणि रॉस टेलर हे सर्वजण त्यांच्या शानदार कारकिर्दीत एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये सामील झाले होते, परंतु आता फक्त टर्नर आणि मिशेल यांनीच पहिले स्थान पटकावण्याची किमया साधली आहे.
दरम्यान, रावळपिंडीत श्रीलंकेविरुद्ध १०२ धावा करणाऱ्या पाकिस्तानचा बाबर आझमला फायदा होऊन तो सहाव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. मालिकेत प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि फखर जमान अनुक्रमे २२ व्या आणि २६ व्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
पाकिस्तानी लेग-स्पिनर अबरार अहमदने एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत ११ स्थानांनी झेप घेत नववे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अबरारने ४१ धावा देऊन ३ बळी टिपले होते. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफला पाच स्थानांचा फायदा होऊन २३ व्या स्थान पटकावले आहे. त्याशिवाय, वेस्ट इंडिजचा जयडेन सील्स तीन स्थानांनी प्रगती करून २० व्या स्थानी पोहोचला आहे. रोस्टन चेसने १२ स्थानांची प्रगती साधत तो ४६ व्या स्थानावर पोहचला आहे.
कसोटी क्रमवारीत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण सहा विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान कायम राखले असून दरम्यान, कुलदीप यादव दोन स्थानांनी प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ व्या स्थान पटकावले आहे. रवींद्र जडेजा चार स्थानांनी प्रगती करत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. ईडन गार्डन्सवर आठ विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर सायमन हार्मर २० स्थानांनी मोठी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम २४ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.






