फोटो सौजन्य – X
भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट मधून त्याचबरोबर t20 क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आता फक्त एकदिवसीय क्रिकेट सामने खेळताना दिसणार आहेत. चॅम्पियनशिप झाल्यानंतर दोन्ही दिग्गज हे अजून पर्यंत खेळताना दिसले नाही. भारतीय क्रिकेटच्या हाताने या दोघांना एकत्र मैदानावर पाहण्याचे उत्सुकता लागली आहे.
भारताचा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर, भारतीय चाहत्यांची निराशा झाली कारण दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली होती. खरंतर, हे दोन्ही दिग्गज टी-२० आणि कसोटीतून निवृत्त झाले आहेत. चाहत्यांनी त्यांना शेवटचे आयपीएल २०२५ दरम्यान खेळताना पाहिले होते. श्रीलंका क्रिकेटने या संधीचा फायदा घेत ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ६ सामन्यांची मर्यादित षटकांची मालिका आयोजित करण्याची ऑफर दिली.
या मालिकेसाठी श्रीलंकेला बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कळाल्याने चाहत्यांना लवकरच रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर दिसतील अशी अपेक्षा आहे. या आठवड्यात सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीदरम्यान अंतिम चर्चा होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर, भारत १७ ऑगस्टपासून बांगलादेशचा दौरा करणार होता. तथापि, बांगलादेशमधील सुरक्षेच्या कारणास्तव, दोन्ही देशांच्या बोर्डांनी २०२६ पर्यंत दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
India – Pakistan पुन्हा एकदा भिडणार! कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming
“आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सिंगापूरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत पुढील चर्चा होईल. आम्हाला दोन किंवा तीन दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे,” असे श्रीलंका क्रिकेटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वेबसाइटला सांगितले. जर या दौऱ्याला मान्यता मिळाली तर ही मालिका कोलंबो आणि कॅंडी येथे आयोजित केली जाऊ शकते. श्रीलंकेने यापूर्वी तीन सामन्यांचे एकदिवसीय आणि समान संख्येचे टी-२० सामने देण्याची ऑफर दिली होती, परंतु पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला लक्षात घेऊन टी-२० मालिकेतील सामने देखील वाढवता येतात.