फोटो सौजन्य – X
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स म्हणजेच WCL 2025 सुरू झाले आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार, 20 जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे. क्रिकेट चाहते अशा स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण त्यांना त्यांचे जुने हिरो – युवराज सिंग, सुरेश रैना, पठाण बंधू आणि शिखर धवन – पुन्हा खेळताना पाहण्याची संधी मिळते.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील खास असेल कारण पाकिस्तानच्या संघात शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह-उल-हक सारखे स्टार देखील आहेत. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध पहिला सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात केली आहे, तर भारत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. IND विरुद्ध PAK सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया-
It’s time to roll back the years! 🤩#YuvrajSingh‘s swagger, #ShikharDhawan‘s flair and #IrfanPathan‘s magic! The legends are back in action to reignite rivalries of the past. 🔥#WorldChampionshipofLegends 2025 Starts 18th July LIVE on Star Sports Network pic.twitter.com/TYdpjmg79m
— Star Sports (@StarSportsIndia) July 18, 2025
भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंडस यांच्यामध्ये 20 जुलै रोजी म्हणजेच रविवारी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा या स्पर्धेचा चौथा सामना असणार आहे. या सामन्याचे आयोजन बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री नऊ वाजता सुरू होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ल्ड कप २०२५ चा चौथा सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग टेलिव्हिजनवर क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे फॅन कोडच्या ॲपवर त्याच बरोबर वेबसाईटवर देखील पाहायला मिळणार आहे.
IND vs ENG : साई सुदर्शनला आणखी एक संधी देण्याची गरज? कोणत्या खेळाडूला करणार संघाबाहेर…
युवराज सिंग, शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, पियुष चावला, स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, गुरकीरत मान.
मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, सर्फराज अहमद, शरजील खान, वहाब रियाझ, आसिफ अली, शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, आमेर यामीन, सोहेल खान, सोहेल तन्वीर.
भारताचा सीनियर संघ हा इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया सध्या कसोटी मालिका खेळत आहे तर दुसरीकडे महिला संघ एक दिवसीय मालिका खेळताना पाहायला मिळत आहे. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू हे या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत युवराज सिंग, शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना सारख्या या खेळाडूंना पुन्हा एकदा खेळताना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.