Rohit Sharma's big test before Australia tour! This new rule of BCCI will decide the future of his career
Rohit Sharma will have to undergo a fitness test : भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आला आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा गेल्या ६ महिन्यांपासून कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. भारताच्या या स्टार खेळाडुने इंग्लंड दौऱ्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. तर त्याने मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी, रोहित शर्माला बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे मोठी परीक्षा द्यावी लागणारआहे. येथे त्याला फिटनेस चाचणीतून जावे लागणार आहे.
हेही वाचा : ZIM VS SL : झिम्बाब्वेला मोठा झटका! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघाचा कर्णधार बाहेर
एका वृत्तानुसार, रोहित दोन-तीन दिवस सेंटर ऑफ एक्सलन्स येथे असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्माला तंदुरुस्त असल्याची टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्याला ब्रोंको चाचणीव्यतिरिक्त अनेक चाचण्या द्याव्या लागणार आहे. या काळात तो सराव सत्रांमध्ये भाग घेणार आहे. रोहित शर्मा गेल्या तीन महिन्यांपासून कोणत्याही क्रिकेटपासून दूर आहे. अशा परिस्थितीत त्याला फिटनेस टेस्टचा सामना करावा लागणार आहे.
वृत्तानुसार, रोहित शर्मा १३ सप्टेंबरपासून बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्टसाठी उपस्थित असणार आहे. तो येथे दोन-तीन दिवस राहणार आहे. तसेच तो नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या तयारीसाठी येथे सराव देखील करणारअ आहे. दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मुख्य मैदानावर (अ) खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे रोहितला फिटनेस टेस्ट देता येणे शक्य होणार नाही तसेच तिथे तो प्रशिक्षण देखील घेऊ शकणार नाही. तो त्याच सुविधेच्या दुसऱ्या मैदानावर फिटनेस टेस्ट आणि प्रशिक्षण घेणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताचे दोन अनुभवी खेळाडू ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध इंडिया अ संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. हे सर्व सामने कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येतील. ही मालिका दोन्ही खेळाडूंसाठी १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या तयारीचा एक महत्वपूर्ण भाग असणार आहे. भारताचा दिग्गज रोहित शर्मा सध्या मुंबईमध्ये भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत सराव करत आहे.
हेही वाचा : US Open 2025 : नोवाक जोकोविकची दमदार मुसंडी! खराब फॉर्मला भेदून तिसऱ्या फेरीत धडक