Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी

वैभव सूर्यवंशीने घातक गोलंदाज असलेल्या मिचेल स्टार्कला अक्षरशः पाणी पाजले आहे. स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर फोर आणि त्यानंतर गगनचुंबी सिक्सर मारून वैभवने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 06:50 PM
कोण स्टार्क अन् कोण बुमराह? Vaibhav Suryvanshi समोर सगळेच फेल; दिल्लीविरुद्ध केली वादळी खेळी
Follow Us
Follow Us:

कालच्या सामन्यात मिशेल स्टार्कच्या 3 विकेट्स 
दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थानवर विजय 
वैभव सूर्यवंशीने स्टार्कची केली धुलाई

Vaibhav Suryavanshi Vs Mitchel Starc: काल दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानवर विजय मिळवला. या सामन्यात चर्चा सुरू होती ती वैभव सूर्यवंशी आणि मिशेल स्टार्क यांच्यातील लढतीची. मात्र वैभवने आपली कामगिरी कायम राखली आहे.

यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने अनेक मोठ्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. अनेक मोठ्या गोलंदाजांची त्याने धुलाई केली आहे. मात्र मिशेल स्टार्क कालच्या सामन्यात काही वेगळे करणार का अशी चर्चा सुरू होती. मात्र वैभव सूर्यवंशीने आपले सातत्य कायम राखले आहे. त्याने स्टार्कची देखील धुलाई केली आहे.

वैभव सूर्यवंशीने घातक गोलंदाज असलेल्या मिचेल स्टार्कला अक्षरशः पाणी पाजले आहे. स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर फोर आणि त्यानंतर गगनचुंबी सिक्सर मारून वैभवने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. मिशेल स्टार्क गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा वैभव सूर्यवंशीच्या चेहऱ्यावर आत्माविश्वास दिसून येत होता.

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

स्टार्कने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर वैभवने शानदार कव्हर ड्राईव्ह मारत चेंडू सीमापार पाठवला. तसेच त्याने तिसऱ्या बॉलवर वैभवने स्टार्कला सिक्सर मारला. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह यांसारख्या भारतीय स्टार गोलंदाजांनाही सळो की पळो करून सोडले . त्यामुळे वैभव सूर्यवंशीने वेगवान गोलंदाजांची धुलाई केल्याचे यंदाच्या हंगामात पाहायला मिळाले.

रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 193 रन्स केल्या. दिल्ली कॅपिटल्सला 194 रन्सचे टार्गेट दिले होते. अभिषेक पोरेल आणि केएल राहुलने चांगली सुरूवात केली आहे. अखेर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे राजस्थानच्या याचणी वाढल्या आहेत. तर दिल्ली अजूनही आपण प्ले ऑफच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे.

इकडे आड अन् तिकडे विहीर! Rishabh Pant समोर अडचणींचा डोंगर; BCCI ‘हा’ निर्णय घेणार?

राजस्थान रॉयल्सकडून सलामीला खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. यशस्वी जयस्वाल आज देखील चांगली खेळी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल 12 रन्स करून आउट झाला. तर वैभव सूर्यवंशीने शानदार आक्रमक खेळी केली आहे. पॉवर प्लेमध्ये त्याने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशी 46 रन्स करून आउट झाला.

Web Title: Rr vaibhav suryvanshi make history against mitchel starc jaspreet bumrah tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Mitchell Starc
  • Vaibhav Suryavanshi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.