DC Vs RR Live Streaming (फोटो- ट्विटर)
राजस्थान रॉयल्सचे दिल्लीला 194 रन्सचे टार्गेट
केएल राहुल आणि अभिषेक पोरेलची दमदार सुरूवात
Tata IPL 2026 DC Vs RR Live Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 193 रन्स केल्या. दिल्ली (IPL 2026) कॅपिटल्सला 194 रन्सचे टार्गेट दिले होते. अभिषेक पोरेल आणि केएल राहुलने चांगली सुरूवात केली आहे. अखेर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे राजस्थानच्या याचणी वाढल्या आहेत. तर दिल्ली अजूनही आपण प्ले ऑफच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे.
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 194 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचे केएल राहुल आणि अभिषेक पोरेल हे मैदानात उतरले. दोघांनी दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरूवात करून दिली. अभिषेक पोरेलने शानदार 51 रन्सची अर्धशतकी खेळी केली. 51 रन्स करून तो आउट झाला. पोरेल आउट होताच साहिल पारख खेळण्यासाठी आला. केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. तो 56 रन्स करून आउट झाला. साहिल पारख 9 रन्स करून आउट झाला. ट्रिस्टन स्टब्स 4 रन्स करून आउट झाला. डेव्हिड मिलर 9 रन्स करून आउट झाला.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना दिल्ली कॅपिटल्सच्या एकाही फलंदाजाला 9 ओव्हर संपेपर्यंत आउट करता आले नाही. ब्रिजेश शर्माने पोरेलला आउट केले. दसुन शनाकाने केएल राहुलला आउट केले. जोफरा आर्चरने साहिल पारखची विकेट घेतली. ट्रिस्टन स्टब्सला जोफरा आर्चरने आउट केले. ब्रिजेश शर्माने मिलरला आउट केले.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सकडून सलामीला खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. यशस्वी जयस्वाल आज देखील चांगली खेळी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल 12 रन्स करून आउट झाला. तर वैभव सूर्यवंशीने शानदार आक्रमक खेळी केली आहे. पॉवर प्लेमध्ये त्याने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशी 46 रन्स करून आउट झाला. रियान परागने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. तो 51 रन्स करून आउट झाला. रवी सिंग 4 रन्स करून आउट झाला. शुभम दुबेने केवळ 5 रन्स केल्या. धरू जुरेलने देखील शानदार अर्धशतक लगावले. दसुन शनाकाने 10 रन्सची खेळी केली.
Openers sailing along in the chase ⛵️ KL Rahul 🤝 Abishek Porel #DC 72/0 after the powerplay. Updates ▶️ https://t.co/JwHkQQ1ayi #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRR pic.twitter.com/He1EMYCSvQ — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेमध्ये एकच विकेट मिळवण्यात यश आले. पॉवर प्लेमध्ये त्यांनी आक्रमक खेळी करण्यासाठी प्रसिड असलेल्या यशस्वी जयस्वालला लुंगी एनगिडीने आउट केले. तर 46 रन्सवर असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला माधव तिवारी या पहिलाच सामना खेळत असलेल्या नवख्या गोलंदाजाने आउट केले. मिशेल स्टार्कने कर्णधार रियान पराग आणि फेरेराची विकेट पटकावली. तसेच मिशेल स्टार्कने रवी सिंगला आउट केले. माधव तिवारीने शुभम दुबेला आउट केले.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ: के.एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, काइल जेमीसन / लुंगी एंगिडी, टी. नटराजन / मुकेश कुमार.
DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सचा संघ: यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, वैभव सूर्यवंशी, शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, यश राज, ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा






