ऋषभ पंतचे पद जाणार? (फोटो- सोशल मिडिया)
भारत अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार एकमेव कसोटी सामना
जसप्रीत बुमराहला बीसीसीआय विश्रांती देण्याची शक्यता
ऋषभ पंतचे उपकर्णधारपद जाण्याचा अंदाज
IND Vs AFG Test Series: सध्या भारतात आयपीएलचा थरार सुरू आहे. हा थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. 31 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर भारत 6 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. मात्र 19 मे रोजी बीसीसीआय काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआय 19 मे रोजी महत्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत अनेक वरिष्ठ आणि युवा खेळाडूंच्या टीम इंडियातील भविष्याबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत ऋषभ पंतबाबत चर्चा होऊ शकते. सध्या ऋषभ पंत कसोटी संघात उपकर्णधार पद सांभाळतो आहे. मात्र त्याचे हे पद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.
सध्या ऋषभ पंत आयपीएलमध्ये लखनौच्या संघाची धुरा सांभाळत आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाला चांगली खेळी करता आलेली नाही. फलंदाजीत देखील त्याला सातत्य ठेवता आले नाहीये. त्यामुळे बीसीसीआय त्याच्याबाबत एखादा मोठा निर्णय घेऊ शकते. मात्र ऋषभ पंतचे कसोटी क्रिकेटमधील योगदान पाहता, बीसीसीआय असा निर्णय घेणार का हे पहावे लागणार आहे.
IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात
आयपीएलचा हा हंगाम संपताच टीम इंडियाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरायचे आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. आयपीएल संपल्यावर खेळाडूंना विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळणार नाही. बीसीसीआयच्या आगामी निर्णयानुसार, टीम इंडिया आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. अफगाणिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहे. मात्र आता बीसीसीआय भारताचा संघ अधिकृतपणे कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Cricket News: अफगाणिस्तानविरूद्ध सॅमसनला डच्चू, पंतऐवजी ‘या’ खेळाडूची वर्णी; अहवालात मोठा दावा
आगामी सामन्यांमध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ आयपीएल हंगामानंतर बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मोहम्मद सिराज देखील खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. सातत्याने क्रिकेट खेळत असल्यामुळे या दोन्ही प्रमुख गोलंदाजांना अफगाणिस्तानविरुद्ध विश्रांती दिली जाते की मायदेशातील सामना असल्याने संघात स्थान मिळते हे पहावे लागणार आहे.






