
2027 मध्ये धोनी आयपीएल खेळण्याची शक्यता
चेन्नई सुपर किंग्ज यंदा प्ले ऑफच्या बाहेर
चेन्नईने आतापर्यंत 5 वेळा जिंकले विजेतेपद
Tata IPL 2026: यंदाच्या आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज प्ले ऑफ शर्यतीमधून बाहेर पडली आहे. काल झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 89 रन्सने दारुण पराभव झाला. यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृत्व करत होता. मात्र यंदा चाहत्यांची निराशा झाली. महेंद्र सिंह धोनी दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. मात्र आता ऋतुराजने धोनी 2027 मध्ये खेळणार की नाही त्यावर भाष्य केले आहे.
काय म्हणाला ऋतुराज गायकवाड?
या वर्षी एमएस धोनी संघात नसल्याने आम्हाला त्रास झाला. त्याची उणीव सतत जाणवत होती. धोनी शेवटच्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी येतो तेव्हा सामन्याची दिशा बदलून जाते. मात्र पुढील वर्षी धोनी खेळणार की नाही हे मला आणि चाहत्यांना पुढील वर्षीच कळू शकेल. पुढील सीझनबाबत आताच काही सांगणे शक्य होणार नाही.
या वर्षी महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2026 मध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नाही. कालच्या महत्वाच्या सामन्यात देखील तो अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. चेन्नईच्या संघाला त्याची उणीव जाणवली आहे. कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने 89 रन्सचे चेन्नईचा पराभव केला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.
CSK vs GT: आधी लाजिरवाणा पराभव नंतर कारवाई; चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड
चेन्नईला दुहेरी धक्का, BCCI ने ठोठावला दंड
गुजरात टायटन्सकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. या पराभवातून संपूर्ण संघ सावरण्याआधी त्यांना चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर, बीसीसीआयने कठोर कारवाई करत चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारासह संपूर्ण संघाला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सामन्यात संघाने स्लो ओव्हर रेटचा नियम मोडल्यामुळे ही शिक्षा देण्यात आली.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या संघाने निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण केली नाहीत. या हंगामातील संघाचा हा दुसरा स्लो ओव्हर रेट टाकण्याचा गुन्हा होता, त्यामुळे कर्णधाराला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संघातील ११ खेळाडू आणि इम्पॅक्ट प्लेयर्ससह उर्वरित खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या २५ टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल, तो दंड आकारला जाईल.’