Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A vs AUS A: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! ऑस्ट्रेलियाने पुन्हा चारली धूळ; भारताचा दारुण पराभव

Australia A beat India A By 69 Runs: भारत 'अ' संघ ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्ध दुसरा एकदिवसीय खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने भारताला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 07:58 PM
Australia A beat India A

Australia A beat India A

Follow Us
Follow Us:
  • ऋतुराजची सेना पुन्हा गारद
  • ऑस्ट्रेलियाचा मालिकाविजय
  • रजत पाटीदारची फिफ्टी व्यर्थ

पुदुचेरी येथे भारत ‘अ’ संघाला ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात दुसरा अनधिकृत एकदिवसीय सामना खेळण्यात आला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाला ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाकडून ६९ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ ४५.२ षटकांत फक्त २०६ धावा करु शकला. या सामन्यात भारताची फलंदाजी खराब झाली आणि कर्णधार ऋतुराजसह पहिले तीन फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. यापूर्वी, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते.(Australia A beat India A By 69 Runs)

SA vs AUS: स्टीव्ह स्मिथने डरकाळी फोडली; ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासात घातला ‘हा’ धुमाकूळ

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारताला चारली धूळ

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ ४९.५ षटकांत २७५ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्स्टासने ८८ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ६७ धावा केल्या. जोश फ्लिपनेही आठ चौकारांसह ५८ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या, तर नॅथन मॅकस्वीनीने ३९ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून अर्शद खानने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले. यश ठाकूरनेही दोन विकेट्स घेतले, तर विप्रज निगम, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

ऋतुराज-पडिक्कल-सुदर्शन पुन्हा फ्लॉप

२७६ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय संघाची आघाडीची फळी कोसळली. सलामीवीर साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल दोघेही अपयशी ठरले. पडिक्कल केवळ एका धावेवर बाद झाला, तर सुदर्शन १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कर्णधार ऋतुराज गायकवाडही पाच चेंडूंमध्ये केवळ १२ धावा करून स्वस्तात बाद झाला. भारताने अवघ्या ३० धावांत तीन विकेट्स गमावले. त्यानंतर ५९ धावांवर कुमार कुशाग्रही १७ धावांवर बाद झाला.

रजत पाटीदारने अर्धशतकी खेळी

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रजत पाटीदारने ८१ चेंडूंमध्ये ६७ धावा करून शानदार अर्धशतक झळकावले. परंतु, त्याच्या या खेळीने भारताला विजय मिळवता आला नाही. अखेरीस, अनुकूल रॉयने नाबाद ३४ धावा करून भारताला २०० धावांच्या पुढे नेले, परंतु तो संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकला नाही. भारतीय संघ ४५.२ षटकांत २०६ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्पेन्सर जॉन्सनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले. तर, मेरेडिथ आणि तनवीर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना ११ ऑक्टोबर रोजी त्याच मैदानावर खेळला जाईल.

क्रिकेट फिव्हर ऑन! Hong Kong Sixes साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार IND vs PAK महामुकाबला

Web Title: Ind a vs aus a india a lost by 69 runs australia won series 2 0 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • India A Team
  • Rajat Patidar
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री
1

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.