
SA vs ENG T20: Phil Salt breaks his own record! England achieves 'this' feat for the first time in T20 cricket
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘गंभीर आल्यापासून अर्शदीपवर..’, यूएईविरूद्धच्या सामन्यावरुन आर अश्विनचे ओढले ताशेरे
या सामन्यात फिल साल्टने ६० चेंडूंचा सामना करत १४१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १५ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीसह त्याने फिल साल्टने तरौबा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध बनवलेल्या ११९ धावांचा स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. साल्टने २०२३ मध्ये ही खेळी खेळली होती. त्यानंतर त्याने आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४१ धावा करून ही कामगिरी केली. इंग्लंडसाठी टी-२० मध्ये टॉप-४ सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्यांपैकी तीन फिल साल्टच्या नावावर जमा आहेत.
इंग्लंडचा वादळी खेळी करणारा फलंदाज फिल साल्टने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम स्थापन केला आहे. साल्टने त्याच्या स्फोटक खेळीने न्यूझीलंडच्या फिन ऍलनला देखील पिछाडीवर सोडले आहे. त्याने सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत दुसरे स्थान काबिज केले आहे.
एक गोष्ट उल्लेखनीय आहे की फिन ऍलनने जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १३७ धावांची वादळी खेळी खेळली होती. तथापि, फिल साल्टने अलीकडेच त्याला पिछाडीवर टाकून एक नवीन विक्रम गाठला आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम अजून देखील ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचच्या नवे जमा आहे. त्याने २०१८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १७२ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती. जी आजपर्यंत अबाधित आहे.
फिल साल्टने फक्त ४२ डावात चौथे शतक लगावले आहे. तो टी-२० मध्ये चार शतके झळकावणारा सर्वात जलद फलंदाज देखील बनला आहे. त्याच वेळी, ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्मा यांच्याकडे टी-२० मध्ये प्रत्येकी ५ शतके जमा आहेत. सूर्यकुमार यादवने ४ शतके झळकावली आहेत.