Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar–Lionel Messi यांची ऐतिहासिक भेट! सचिनने दिली जर्सी, तर मेस्सीनेही दिलं ‘हे’ स्पेशल रिटर्न गिफ्ट

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रीडा क्षेत्रातील दोन दिग्गजांची भेट झाली. अर्थातच ही भेट फुटबॉलपटू मेस्सी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची होती. चला या ऐतिहासिक भेटीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2025 | 09:51 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक भेट
  • सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सीची भेट
  • सचिनने दिली खास त्याची टीम इंडियाची जर्सी
जसं क्रिकेट म्हंटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सचिन तेंडुलकर येऊन उभा राहतो. अगदी तसेच फ़ुटबॉल म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर लिओनेल मेस्सी उभा राहतो. दोघेही त्यांच्या खेळातील दिग्गज खेळाडू आहेत. याच दिग्गजांची भेट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाली.

क्रीडा विश्वात 10 नंबर जर्सीला ओळख मिळवून देणारे दोन दिग्गज खेळाडू मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भेटले. सचिन तेंडुलकर आणि लिओनेल मेस्सी यांची मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भेट झाली, यावेळी सचिनने मेस्सीला त्याची क्रिकेट जर्सी भेट दिली. क्रिकेट आणि फुटबॉलच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरला.

IND vs SA 3rd T20I: भारतीय गोलंदाजांचा कहर! दक्षिण आफ्रिका सर्वबाद, टीम इंडियासमोर ११८ धावांचे लक्ष्य

लिओनेल मेस्सीने वानखेडे स्टेडियमवर माजी भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर “मास्टर ब्लास्टर” सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांमध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

VIDEO | Maharashtra: Amid loud cheers, Indian cricket legend Sachin Tendulkar gifts Argentine football icon Lionel Messi the 2011 World Cup jersey, calling it a golden moment for Mumbai and India. (Source: Third Party) (Full VIDEO available on PTI Videos –… pic.twitter.com/GKIqReBoqa — Press Trust of India (@PTI_News) December 14, 2025

सचिन तेंडुलकरने मेस्सीला त्याची 2011 ची एकदिवसीय विश्वचषक जर्सी भेट दिली. तसेच अर्जेंटिनाच्या फुटबॉल दिग्गजाने सचिन तेंडुलकरला 2022 च्या विश्वचषकाचा चेंडूही भेट दिला. सचिन तेंडुलकर काय म्हणत आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत एक ट्रान्स्लेटर सुद्धा उपस्थित होता.

IND Beat PAK: आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारतीय संघाचा दणदणीत विजय, आयुष म्हात्रेच्या टीमने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

मेस्सीबद्दल सचिन काय म्हणाला?

दरम्यान, सचिन तेंडुलकरला लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीबद्दल त्याचे काय मत आहे असे विचारण्यात आले. ते म्हणाले, “आम्ही लिओनेल मेस्सीच्या चिकाटीचा आणि वचनबद्धतेचा आदर करतो. त्याच्या नम्र स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल त्याचे खूप कौतुक आहे. मुंबई आणि भारतातील लोकांच्या वतीने, मी मेस्सी आणि त्याच्या कुटुंबाला आनंद आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.”

मेस्सीचा भारत दौरा

13 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी कोलकाता येथे पोहोचला, त्यानंतर हैदराबाद येथे त्याने राहुल गांधींची भेट घेतली आणि एका प्रदर्शनीय सामन्यात तो सहभागी झाला. तो आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचला आणि उद्या, 15 डिसेंबर रोजी दिल्लीला जाणार आहे.

Web Title: Sachin tendulkar meet lionel messi at wankhede stadium gifted 2011 odi world cup jersy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • Lionel Messi
  • Sachin Tendulkar
  • Sports
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

यशस्वी जयस्वालने ठोकले शतक, निवडकर्त्याने वेधले लक्ष! भारतीय संघात मिळणार पुन्हा कमबॅक करण्याची संधी?
1

यशस्वी जयस्वालने ठोकले शतक, निवडकर्त्याने वेधले लक्ष! भारतीय संघात मिळणार पुन्हा कमबॅक करण्याची संधी?

Lionel Messi India Tour : Lionel Messi ने हैदराबादमध्ये खेळला फुटबॉल, Rahul Gandhi सोबतही केली खास भेट
2

Lionel Messi India Tour : Lionel Messi ने हैदराबादमध्ये खेळला फुटबॉल, Rahul Gandhi सोबतही केली खास भेट

John Cena च्या अंतिम सामन्यासाठी WWE दिग्गज आले एकत्र, चाहते आणि सुपरस्टार यांच्या डोळ्यात अश्रू
3

John Cena च्या अंतिम सामन्यासाठी WWE दिग्गज आले एकत्र, चाहते आणि सुपरस्टार यांच्या डोळ्यात अश्रू

19000 WWE चाहत्यांसमोर जॉन सीनाने निवृत्तीचा सामना गमावला, २३ वर्षांच्या कारकिर्दीचा झाला अंत
4

19000 WWE चाहत्यांसमोर जॉन सीनाने निवृत्तीचा सामना गमावला, २३ वर्षांच्या कारकिर्दीचा झाला अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.