Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sandpaper Gate Controversy : सँडपेपरगेट वाद पुन्हा पेटला! ऑस्ट्रेलियन संघात अजूनही फूट? आर. अश्विनने मांडले धक्कादायक निरीक्षण

Sandpaper Gate Controversy : 2018 च्या सँडपेपरगेट प्रकरणावर उस्मान ख्वाजाच्या आत्मचरित्रामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघातील मतभेद अद्याप कायम असल्याचे निरीक्षण आर. अश्विनने नोंदवले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 17, 2026 | 04:36 PM
Sandpaper Gate Controversy : सँडपेपरगेट वाद पुन्हा पेटला! ऑस्ट्रेलियन संघात अजूनही फूट? आर. अश्विनने मांडले धक्कादायक निरीक्षण

Sandpaper Gate Controversy : सँडपेपरगेट वाद पुन्हा पेटला! ऑस्ट्रेलियन संघात अजूनही फूट? आर. अश्विनने मांडले धक्कादायक निरीक्षण

Follow Us
Follow Us:
  • ख्वाजाच्या पुस्तकामुळे जुना वाद चर्चेत
  • कमिन्स आणि वॉर्नर यांच्या विधानांमुळे मतभेद उघड
  • कमिन्स आणि वॉर्नर यांच्या विधानांमुळे मतभेद उघड
 

Sandpaper Gate Controversy : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील 2018 च्या बहुचर्चित सँडपेपरगेट प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा याचे आत्मचरित्र ‘सब्र’ प्रकाशित झाल्यानंतर या प्रकरणातील नव्या दाव्यांमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने या वादावर भाष्य करत ऑस्ट्रेलियन संघातील मतभेद अद्याप संपलेले नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. अश्विनच्या मते, सँडपेपरगेट प्रकरणावर ऑस्ट्रेलियाच्या माजी आणि विद्यमान खेळाडूंमध्ये आजही एकमत नाही. त्यामुळे संघाच्या ड्रेसिंग रूममधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.

ख्वाजाच्या पुस्तकामुळे जुना वाद चर्चेत

उस्मान ख्वाजा याने आपल्या ‘सब्र’ या आत्मचरित्रात 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड कर mqpण्यासाठी सँडपेपरचा वापर करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्याच्या मते, या प्रकाराची माहिती केवळ तीन खेळाडूंनाच नव्हती, तर ऑस्ट्रेलियन संघातील इतर सदस्यांनाही याची कल्पना होती. पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या यापूर्वीच्या कसोटी सामन्यातही असाच प्रकार घडल्याचा दावा ख्वाजाने केला आहे.

MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त

कमिन्स आणि वॉर्नर यांच्या विधानांमुळे मतभेद उघड

स्टार स्पोर्ट्सच्या ‘सँडपेपरगेट : द अनसेटल्ड डिबेट’ या कार्यक्रमात बोलताना अश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या वेगवेगळ्या भूमिकांवर भाष्य केले.
अश्विन म्हणाला, ख्वाजाने आपल्या पुस्तकात संपूर्ण घटना स्पष्टपणे मांडली आहे. तो सामूहिक जबाबदारीची मागणी करत आहे. त्याच्या मते, या प्रकरणाची माहिती केवळ तीन जणांनाच नव्हती, तर इतरांनाही याबाबत माहिती होती.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने ख्वाजाचे दावे निराधार, निरर्थक आणि पुराव्याविना असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरच्या विधानातून ख्वाजाच्या भूमिकेला समर्थन मिळत असल्याचे अश्विनने नमूद केले.

IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज

ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममधील मतभेद कायम?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पुन्हा उघडण्याची गरज नसल्याचे म्हटल्याबद्दल अश्विनने समाधान व्यक्त केले. मात्र, खेळाडूंकडून येणारी वेगवेगळी विधाने चिंताजनक असल्याचे त्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये या प्रकरणाबाबत आधीपासूनच वेगवेगळी मते होती. आता हे मतभेद संपले आहेत, असे मला वाटत नाही. हीच माझ्यासाठी अधिक चिंतेची बाब आहे, असे अश्विन म्हणाला.

नेमके काय होते सँडपेपरगेट प्रकरण?

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि चेंडूवर सँडपेपर वापरताना कॅमेरात दिसलेला कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

या घटनेवेळी पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कदेखील ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होते. त्यामुळे ख्वाजाचे दावे आणि कमिन्सची भूमिका यामुळे जुन्या प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सँडपेपरगेट प्रकरण पुन्हा चर्चेत का आले आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याचे 'सब्र' हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर 2018 मधील चेंडूशी छेडछाड प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

  • Que: सँडपेपरगेट प्रकरणावर आर. अश्विनने काय म्हटले?

    Ans: ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंची या प्रकरणाबाबत वेगवेगळी मते असून ड्रेसिंग रूममधील मतभेद अद्याप संपलेले नाहीत, असे अश्विनने म्हटले.

  • Que: उस्मान ख्वाजाने आपल्या पुस्तकात काय दावा केला आहे?

    Ans: 2018 मध्ये चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रकाराची माहिती केवळ तीन खेळाडूंनाच नव्हती, तर ऑस्ट्रेलियन संघातील इतर सदस्यांनाही याची कल्पना होती, असा दावा ख्वाजाने केला आहे.

Web Title: Sandpaper gate controversy r ashwin australia team divided usman khawaja book rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • David Warner
  • R Ashwin
  • Usman Khawaja

संबंधित बातम्या

Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी… उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला
1

Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी… उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.