Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी… उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला

Usman Khawaja : उस्मान ख्वाजाने आपल्या 'सब्र' आत्मचरित्रातून २०२३ अॅशेस मालिकेदरम्यान लॉर्ड्समध्ये एमसीसीच्या सदस्याने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 11, 2026 | 02:04 PM
Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी... उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला

Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी... उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला

Follow Us
Follow Us:
  • ‘सब्र’ आत्मचरित्रातून अॅशेस मालिकेतील घटनेला उजाळा
  • एमसीसीच्या सदस्याने शिवी दिल्याचा आरोप
  • डेव्हिड वॉर्नरलाही आलेला अनुभव
 

क्रिकेटच्या प्रतिष्ठित लॉर्ड्स मैदानावर २०२३ मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेदरम्यान आपल्याला वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागल्याचा खळबळजनक खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने केला आहे. आपल्या ‘सब्र’ या आत्मचरित्रातून त्याने या घटनेचा तपशील मांडला आहे.

इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्या वादग्रस्त स्टम्पिंगनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) एका सदस्याने आपल्याला वर्णद्वेषी शिवी दिल्याचा आरोप ख्वाजाने केला आहे.

लंचच्या विश्रांतीदरम्यान घडलेली घटना

ही घटना २०२३ च्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचच्या विश्रांतीदरम्यान घडली होती. त्या वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानावरून लॉर्ड्सच्या प्रसिद्ध लॉन्ग रूममधून पॅव्हेलियनकडे परतत होते. बेअरस्टोच्या वादग्रस्त स्टम्पिंगमुळे सामन्यात आधीच वातावरण तापले होते. त्यातच प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हूटिंग आणि शिवीगाळ केली जात होती. याच दरम्यान एमसीसीच्या काही सदस्यांनीही खेळाडूंना अपशब्द वापरल्याचे ख्वाजाने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या घटनेचे पडसाद त्यावेळी मैदानावरही उमटले होते. स्काय स्पोर्ट्सच्या प्रक्षेपणादरम्यान ख्वाजा एका एमसीसी सदस्याशी वाद घालताना दिसला होता. तसेच अवे ड्रेसिंग रूमकडे जाण्यापूर्वी त्याने अन्य एका सदस्याबाबत सुरक्षारक्षकांकडे तक्रार केल्याचेही चित्रणात दिसले होते.

वाढदिवशी Sanju Samson ला खास गिफ्ट! केरळच्या कर्णधारपदाची मिळाली जबाबदारी, आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान

एमसीसीच्या अनेक सदस्यांकडून झालेली शिवीगाळ

ख्वाजाने आपल्या पुस्तकात लॉर्ड्समधील वातावरणाचे वर्णन करताना सांगितले की, एमसीसीचे काही सदस्य एकाच वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शिवीगाळ करत होते. हा प्रकार पाहून सुरुवातीला आपल्याला धक्काच बसला आणि आपण हसलोही, असे त्याने म्हटले आहे. जगातील प्रतिष्ठित क्रिकेट क्लबच्या लॉन्ग रूममध्ये अशा प्रकारचे वर्तन घडत असल्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

खेळाडू पुढे जात असताना एका सदस्याने अगदी कानाजवळ येऊन ओरडल्याचे ख्वाजाने सांगितले. त्यावर त्याने संबंधित व्यक्तीला पुन्हा असे करण्याची हिंमत करू नकोस, असा इशारा दिला. मात्र, पुढे जात असताना दुसऱ्याच एका व्यक्तीने आपल्याला उद्देशून वर्णद्वेषी शिवी वापरल्याचे ऐकले आणि त्याचा संयम सुटला, असे त्याने आत्मचरित्रात नमूद केले आहे.

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम

घटनेनंतर तीन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई

या घटनेबाबत ख्वाजाने एक महत्त्वाची बाबही स्पष्ट केली आहे. वर्णद्वेषी टिप्पणी करणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्याने सांगितले. ज्या पहिल्या सदस्याने आपल्यासमोर आरडाओरडा केला, त्यालाच आपण जबाबदार समजून त्याच्याशी सामना केला होता. संबंधित व्यक्ती आपल्या चेहऱ्यासमोर ओरडत होती आणि थुंकत होती. त्यामुळे सुरक्षारक्षकांना त्या व्यक्तीला बाहेर काढण्यास सांगितल्याचे ख्वाजाने लिहिले आहे.

या घटनेनंतर एमसीसीने तीन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. चौकशीनंतर एका सदस्याला क्लबमधून काढून टाकण्यात आले, तर अन्य दोन सदस्यांना अनुक्रमे साडेचार वर्षे आणि अडीच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. मात्र, ख्वाजाच्या म्हणण्यानुसार, वर्णद्वेषी टिप्पणी करणारी व्यक्ती नेमकी कोण होती, याची त्याला खात्री नव्हती. त्यामुळे या कारवाईतील सदस्यांपैकी नेमक्या कोणत्या व्यक्तीने ती टिप्पणी केली होती, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

डेव्हिड वॉर्नरलाही आलेला अनुभव

विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू डेव्हिड वॉर्नरही ख्वाजासोबत होता. सदस्यांकडून खेळाडूंना त्रास दिला जात असल्याचे त्यानेही अनुभवले होते. जिन्यावरून जात असताना एका सदस्याने आपल्याला आणि वॉर्नरला पाय अडवून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही ख्वाजाने आत्मचरित्रात केला आहे.

लॉर्ड्सवरील या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला होता. मात्र, जॉनी बेअरस्टोच्या स्टम्पिंगनंतर निर्माण झालेला वाद आणि लॉन्ग रूममधील खेळाडूंसोबतचे गैरवर्तन यामुळे हा सामना विशेष चर्चेत राहिला.

दरम्यान, ख्वाजाचे ‘सब्र’ हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले असून त्यातून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक वादग्रस्त आणि महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश पडला आहे. लॉर्ड्समधील वर्णद्वेषी टिप्पणीचा आरोप हा त्यातील चर्चेत आलेल्या खुलाशांपैकी एक आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: उस्मान ख्वाजाने कोणता खुलासा केला आहे?

    Ans: २०२३ च्या अॅशेस मालिकेदरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर एमसीसीच्या एका सदस्याने आपल्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप ख्वाजाने केला आहे.

  • Que: ही घटना कधी घडली होती?

    Ans: २०२३ मधील अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचच्या वेळी ही घटना घडल्याचे ख्वाजाने सांगितले.

  • Que: ही घटना कशामुळे चर्चेत आली?

    Ans: जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त स्टम्पिंगनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

Web Title: Usman khawaja racist abuse lords 2023 ashes revelation rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • David Warner
  • Usman Khawaja

संबंधित बातम्या

Michael Clarke : सॅण्डपेपर प्रकरणाची फेरचौकशी करा; ‘आम्हाला सत्य माहीत नाही’, मायकेल क्लार्कची मागणी
1

Michael Clarke : सॅण्डपेपर प्रकरणाची फेरचौकशी करा; ‘आम्हाला सत्य माहीत नाही’, मायकेल क्लार्कची मागणी

David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरण पुन्हा चर्चेत; वॉर्नर ख्वाजाच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ मैदानात
2

David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरण पुन्हा चर्चेत; वॉर्नर ख्वाजाच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ मैदानात

बोंबला! Usman Khawaja ने ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे वाभाडे? Ball Tampering प्रकरणात म्हणाला, ‘खेळाडूंनाच नाही, तर…’
3

बोंबला! Usman Khawaja ने ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे वाभाडे? Ball Tampering प्रकरणात म्हणाला, ‘खेळाडूंनाच नाही, तर…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.