IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज, सौजन्य : आयएएनएस
IPL 2027 : हर्षल पटेल आयपीएल 2027 मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळताना दिसणार आहे. हर्षलला सनरायजर्स हैदराबादने (SRH) गुजरात टायटन्ससोबत ट्रेड केले आहे. पटेलच्या ट्रेडची अधिकृत घोषणा मंगळवारी आयपीएलच्या गव्हर्निंग बॉडीने केली. आयपीएलमध्ये दोन वेळा पर्पल कॅप जिंकलेला हर्षलच्या संघातील प्रवेशाने गुजरात टायटन्स (GT)ची गोलंदाजी बळकट झाली आहे.
हर्षल पटेलला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये SRHने 8 कोटी रुपयात विकत घेतले होते. आता पटेल 4 कोटी रुपयांच्या तोट्यासह म्हणजेच 4 कोटी रुपयांच्या करारावर गुजरात टायटन्समध्ये समाविष्ट झाला आहे. या देवाण-घेवाण प्रक्रियेमुळे पटेल आता आपल्या राज्यातील संघाकडून खेळताना दिसेल. अहमदाबादमध्ये जन्मलेल्या या पेसरने 2025-26 च्या सत्रात स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुनरागमन केले आहे.
पटेलला आयपीएलचा मोठा अनुभव आहे. त्याने सर्वोत्तम गोलंदाजीच्या जोरावर आपली ओळख निर्माण झाली. त्याला अखेरच्या षटकातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखले जाते. पटेलने 2012 मध्ये आयपीएल डेब्यूनंतर 124 सामन्यात 151 विकेट प्राप्त केले. त्याने दोन वेळा पर्पल कॅप जिंकली. 2021 आणि 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS)चे प्रतिनिधित्व करताना स्पर्धेतील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज राहिला.
हर्षलने आयपीएल 2025 मध्ये 13 सामन्यात 16 विकेट घेतले. मागील हंगाम मात्र त्याच्यासाठी चांगला राहिला नाही. तो फक्त 5 सामने खेळू शकला, ज्यात त्याला एकही विकेट मिळाला नाही.
दोन वाघ मैदानात पुन्हा कधी दिसणार? Rohit & Virat ‘या’ सिरीजमध्ये खेळताना दिसणार; मोठी अपडेट समोर
GT मध्ये वेगवान गोलंदाजाच्या रुपात कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जेसन होल्डर आणि अशोक शर्मासारखे दमदार गोलंदाज अगोदर उपस्थित आहेत. अशात हर्षल या गोलंदाजी आक्रमणाला आणखीन धार देऊ शकतो. आयपीएलमध्ये पटेल RCB, SRH, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी खेळला आहे.
पटेलने भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने 25 टी-20 सामन्यात 29 विकेट घेतले आहेत. SRH ने अगोदरच दिल्ली कॅपिटल्स (DC) कडून टी. नटराजनला आपल्या गटात घेत आपली गोलंदाजी बळकट केली आहे. नटराजनला DC कडून मागील दोन सामन्यात म्हणावी तशी संधी मिळाली नाही. SRHने चेन्नई सुपर किंग्ज (CSK)कडून वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि नाथन एलिसलाही संघात समाविष्ट करण्यात आले.
IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…
Ans: हर्षल पटेल IPL 2027 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे.
Ans: गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादकडून हर्षल पटेलला ट्रेड केले आहे.
Ans: गुजरात टायटन्सच्या संघात कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जेसन होल्डर आणि अशोक शर्मा यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत.






