Neither Pant nor Rahul! 'This' player is the selectors' special choice as wicketkeeper for Asia Cup 2025..
Asia Cup 2025 : नुकताच भारतीय कसोटी संघाचा इंग्लंड दौरा संपला आहे. शुभमन गिल च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आहे. या पाच सामन्यांची कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंनी फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये शानदार चमक दाखवली आहे. आता भारतीय संघ आपल्या मायदेशी परतला आहे. आता सर्वांच्या नजरा आगामी आशिया कप २०२५ कडे (Asia Cup 2025) खिळल्या आहेत. या स्पर्धेला पुढील महिन्यात ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यावेळीही या स्पर्धेचे सामने टी-२० स्वरूपात खेळवली जाणार आहे. या काळात टीम इंडिया १० सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
हेही वाचा : IND vs ENG मालिकेनंतर बेन स्टोक्स नव्या भूमिकेत! हॅरी ब्रुकच्या संघाचा बनला मेंटाॅर
आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडिया आपला पहिला सलामी सामना यूएईसोबत खेळणार आहे. अद्याप टीम इंडियाने यासाठी आपल्या सांघाची घोषणा केलेली नाही. सध्या टीम इंडियाकडे कोणत्याही क्षेत्रात खेळाडूंची कमतरता जाणवत नाही. अशा परिस्थितीत, निवडकर्ते विकेटकीपर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. कारण या स्थानासाठी तीव्र स्पर्धा असल्याचे दिसत आहे. यापूर्वी या शर्यतीत विकेटकीपरसाठी ऋषभ पंत आणि केएल राहुलची नावे होती, परंतु आता तिसऱ्या खेळाडूबद्दल देखील चर्चा सुरू झाली आहे.
आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या संघाची क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहेत. दरम्यान, एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अहवालात बोलण्यात आले आहे की, यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन हा व्यवस्थापनाची पहिली पसंती असणार आहे. त्याच वेळी, टीम इंडियाकडे आधीच ऋषभ पंत आणि केएल राहुलच्या रूपात दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. परंतु ऋषभ पंतचा टी-२० संघात समावेश होणे थोडे कठीण मानले जात आहे. यामागील कारण म्हणजे इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याला झालेली दुखापत गंभीर असून त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. या दरम्यान, रिव्हर्स शॉट मारण्याध्यान नादात तो क्रिस वोक्सचा चेंडू पंतच्या उजव्या पायावर आदळला होता त्यात तो जखमी झाला. यावेळी त्याला चालू सामन्यातून मैदान सोडावे लागले होते.असे असून देखील पंत दुसऱ्या दिवशी कसोटी सामन्यात फलंदाजी करण्यासाठी उतरलला आणिम त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु त्याला पाचव्या कसोटीपासून मुकावे लागेल. अशा परिस्थितीत, आता असे मानले जात आहे की, विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आशिया कप २०२५ मध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर, संजू सॅमसन आशिया कप २०२५ मध्ये विकेटकीपर म्हणून निवडकर्त्यांची पहिली पसंती बनण्याची शक्यता आहे. संजूने आतापर्यंत टीम इंडियासाठी एकूण ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळलेले आहेत. या दरम्यान, त्याने १५२.३९ च्या स्ट्राईक रेटने ८६१ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने एकूण ३ शतके आणि २ अर्धशतके लगावली आहेत.